Congress Radhika Khera : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला (Congress) आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि छत्तीसगड काँग्रेसच्या नेत्या राधिका खेरा (Radhika Khera) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. राजीनामा देताना राधिका यांनी 'मी एक मुलगी आहे आणि लढू शकते,' असे म्हटले आहे. राधिकाने राजीनामा पत्रही सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
श्रीरामाच्या दर्शनामुळे माझा विरोध आपल्या राजीनाम्याच्या पत्रात राधिका यांनी लिहिले की, प्राचीन काळापासून धर्माचे समर्थन करणाऱ्यांना विरोध केला जातोय. हिरण्यकशिपूपासून ते रावण आणि कंसापर्यंत...अनेक उदाहरणे आहेत. प्रभू श्रीरामाचे नाव घेणाऱ्यांना सध्या काही लोक विरोध करत आहेत. प्रत्येक हिंदूसाठी प्रभू श्रीरामची जन्मभूमी पावित्र्य स्थान आहे. रामलल्लाच्या दर्शनाने प्रत्येक हिंदू आपले जीवन सार्थक झाल्याचे मानतो. पण, काही लोक याला विरोध करत आहेत.
मी ज्या पक्षाला माझ्या आयुष्यातील 22 वर्षांपेक्षा जास्त काळ दिला, NSUI ते AICC च्या मीडिया विभागापर्यंत पूर्ण प्रामाणिकपणे काम केले, आज मला त्याच पक्षाच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागत आहे. याचे कारण काय? तर मी अयोध्येत रामललाचे दर्शन घेतले. माझा इतका तीव्र पातळीवर विरोध झाला की, छत्तीसगड प्रदेश काँग्रेस कार्यालयात मला न्यायही मिळाला नाही. मी नेहमीच प्रत्येक व्यासपीठावरुन इतरांना न्याय मिळवून देण्यासाठी लढले, पण माझ्या माझ्याच पक्षात पराभव झाला. पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांना वारंवार कळवूनही न्याय न मिळाल्याने मी आज हे पाऊल उचलले आहे, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले.