नवी दिल्ली - देशात कोरोनाचा धोका वाढत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 50 लाखांचा टप्पा पार केला असून रुग्णांची संख्या 50,20,360 वर पोहोचली आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 90,123 नवे रुग्ण आढळले असून 1,290 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 82,066 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
देशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. कोरोनाच्या संकटात मोदी सरकारने खयाली पुलाव केले असं म्हणत राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "कोरोनाच्या संकटात मोदी सरकारने खयाली पुलाव केले. 21 दिवसांमध्ये कोरोनावर मात करू, आरोग्य सेतू अॅपमुळे संरक्षण होईल, 20 लाख कोटींचे पॅकेज, आत्मनिर्भर व्हा, सीमेवर कोणीही घुसखोरी केली नाही, परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र संकटातील संधी हे एक सत्य होतं" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल यांनी याआधीही देशात कोरोनाच्या वाढत्या प्रसारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.
"कोरोनामध्ये आत्मनिर्भर व्हा, स्वतःचा जीव स्वतःच वाचवा कारण पंतप्रधान मोरासोबत व्यस्त आहेत"
"अनियोजित लॉकडाऊन ही एका अहंकारी व्यक्तीची देण आहे. ज्यामुळे कोरोना देशभरात पसरला. आत्मनिर्भर व्हा, स्वतःचा जीव स्वतःच वाचवा, कारण पंतप्रधान मोरासोबत व्यस्त आहेत" असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केले आहे. "कोरोनाची रुग्णसंख्या या आठवड्यात 50 लाख आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 10 लाखांच्या पुढे जाईल. अनियोजित लॉकडाऊन एका व्यक्तीच्या अहंकाराची देण आहे, ज्यामुळे कोरोना देशभर पसरला. मोदी सरकारने आत्मनिर्भर व्हा असं सांगितलं आहे. म्हणजेच स्वतःचा जीव स्वतःच वाचवा, कारण पंतप्रधान मोरासोबत व्यस्त आहेत" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
"मोदी सरकारने देशातील तरुणांचं भविष्य पायदळी तुडवलं", राहुल गांधींचा घणाघात
काही दिवसांपूर्वी "मोदी सरकारने देशातील तरुणांचं भविष्य पायदळी तुडवलं" असं म्हणत राहुल गांधींनी जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. राहुल गांधी यांनी काँग्रेसकडून सुरू करण्यात आलेल्या स्पिक अप मोहिमेत ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला होता. मोदी सरकारच्या धोरणांमुळे देशातील करोडो लोकांच्या नोकऱ्या गेल्याचं म्हटलं. "अचानक लागू करण्यात आलेला लॉकडाऊन असंघटीत क्षेत्रासाठी मृत्यूदंडासारखाच सिद्ध झाला. 21 दिवसांत कोरोना संपवण्याचं वचन दिलं होतं पण कोट्यवधी रोजगार आणि छोटे उद्योग संपवण्यात आले" असं ही राहुल यांनी म्हटलं होतं.
"21 दिवसांत कोरोना संपवण्याचं वचन होतं पण कोट्यवधी रोजगार, छोटे उद्योग संपवण्यात आले"
"कोरोनाच्या नावावर जे केलं, ते असंघटीत क्षेत्रावरील तिसरं आक्रमण होतं. छोट्या आणि मध्यम उद्योग चालवणारे लोक रोज कमवतात आणि खातात. जेव्हा कोणतीही सूचना न देता लॉकडाऊन केलं तेव्हा ते यांच्यावरील आक्रमण होतं.पंतप्रधानांनी 21 दिवसांची लढाई असेल असं सांगितलं होतं पण असंघटीत क्षेत्राचा 21 दिवसांत कणाच तुटला. लॉकडाऊननंतर तो उठवण्याची वेळ आली. या काळात काँग्रेसने एक नाही, तर अनेक वेळा सांगितलं की, गरिबांची मदत करावीच लागेल. न्याय योजनेसारखी एक योजना लागू करावी लागेल. थेट बँक खात्यात पैसे जमा करावे लागतील. पण तसं नाही केलं."
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : 1 ऑक्टोबरपासून देशभरात चित्रपटगृह सुरू होणार?, जाणून घ्या 'त्या' मागचं सत्य
"सरकारने विवेकबुद्धी गहाण ठेवलीय काय?, हे सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?"
Apple Event 2020 : अवघ्या 15 सेकंदांत रक्तातील ऑक्सिजन मोजणार, दमदार फीचर्ससह Apple Watch 6 लाँच