नवी दिल्ली - बिहारमध्ये जोरदार प्रचार सुरू असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे. मंगळवारी बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. "शेतकरी शेतमाल विमानाने विकणार की रस्त्यावर आणि बिहारमध्ये रस्ते कुठे आहेत?" असं म्हणत मोदींना टोला लगावला आहे.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, आम्ही आणलेल्या कायद्यांमुळे शेतकरी त्याचा शेतमाल देशात कुठेही जाऊन विकू शकतो. मला नरेंद्र मोदींनी उत्तर द्यावं की शेतकरी विमानाने त्याचा शेतमाल विकण्यासाठी जाईल की रस्त्यावर शेतमाल विकेल? रस्त्यावर शेतमाल विकायचा असेल तर बिहारमध्ये रस्ते कुठे आहेत?" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. सभेमध्ये त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Bihar Election 2020 : "भाजपा-आरएसएसचे काम हे द्वेष पसरवणं आणि फूट पाडण्याचं"
राहुल गांधी यांनी मंगळवारी किशनगंजमध्ये जाहीर सभा घेतली. राहुल यांनी यावेळी केंद्रातील मोदी सरकार आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांनी एकत्र बिहारची लूट सुरू केली आहे. बिहारमधील शेतकरी, कामगार, छोट्या दुकानदारांना संपवलं आहे. यामुळे बिहारच्या तरुणांनी आणि शेतकऱ्यांनी आता महाआघाडीला विजयी करून बिहारमध्ये सत्ता बदलाचं काम करावं आहे" असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे.
"नवा कृषी कायदा खास लोकांसाठी, अंबानी, अदानींशी शेतकरी सौदा करू शकतील का?"
"छत्तीसगडमधील सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करते आणि बिहार सरकार शेतकर्यांचे पैसे लाटते. पंतप्रधान मोदींनी एक नवीन कृषी कायदे केले. हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. हे कायदे मोदींनी त्यांच्या काही मित्रांसाठी केले आहेत. अंबानी आणि अदानी यांच्याशी शेतकरी व्यवहार करू शकतील का? एक गुजरातमध्ये, एक मुंबईत आणि तुम्ही बिहारमध्ये. छत्तीसगडप्रमाणे बिहारमधील शेतकऱ्यांनाही थेट खात्यात 2500 रुपये मिळावेत, असा आमचा विचार आहे" असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.