"पेट्रोल डिझेलचे भाव किती वाढवू?, कोणती सरकारी कंपनी विकू...पंतप्रधानांची Daily To-Do List;" राहुल गांधींचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 01:03 PM2022-03-30T13:03:24+5:302022-03-30T13:03:59+5:30

गेल्या नऊ दिवसांमध्ये ८ वेळा झाली आहे पेट्रोल-डिझेलची दरवाढ. बुधवारी पुन्हा एकदा दरात झाली ८० पैशांची वाढ.

congress rahul gandhi attacks pm narendra modi over petrol diesel gas price unemployment share daily to do list twitter | "पेट्रोल डिझेलचे भाव किती वाढवू?, कोणती सरकारी कंपनी विकू...पंतप्रधानांची Daily To-Do List;" राहुल गांधींचा टोला

"पेट्रोल डिझेलचे भाव किती वाढवू?, कोणती सरकारी कंपनी विकू...पंतप्रधानांची Daily To-Do List;" राहुल गांधींचा टोला

Next

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवरून (Petrol-Diesel Price Hike) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) निशाणा साधला आहे. एवढेच नाही तर तरुणांना रोजगार, खाजगीकरण आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुनही त्यांनी केंद्र सरकारला घेरलं आहे. पंतप्रधान मोदींची Daily To Do List असं म्हणत त्यांनी एक यादी शेअर केली आहे.

"पंतप्रधानांची Daily To Do List.. १. पेट्रोल-डिझेल-गॅसचे दर किती वाढवू, २. लोकांची खर्चावर चर्चा कशी थांबवू, ३.तरुणांना रोजगारांची पोकळ स्वप्न कशी दाखवू, ४. आज कोणती सरकारी कंपनी विकू, ५. शेतकऱ्यांना अधिक लाचार कसं करू," असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे. याशिवाय त्यांनी #RozSubahKiBaat असा हॅशटॅगही दिला आहे.


पुन्हा पेट्रोल-डिझेलची दरवाढ
भारतात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सातत्यानं वाढ होत आहे. गेल्या ९ दिवसांमध्ये ८ वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करण्यात आली. ३० मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० पैशांची वाढ करण्यात आली. या दरवाढीनंतर डिझेलच्या दरानंही आता शतक पूर्ण केलं आहे.

Web Title: congress rahul gandhi attacks pm narendra modi over petrol diesel gas price unemployment share daily to do list twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.