पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवरून (Petrol-Diesel Price Hike) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) निशाणा साधला आहे. एवढेच नाही तर तरुणांना रोजगार, खाजगीकरण आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुनही त्यांनी केंद्र सरकारला घेरलं आहे. पंतप्रधान मोदींची Daily To Do List असं म्हणत त्यांनी एक यादी शेअर केली आहे.
"पंतप्रधानांची Daily To Do List.. १. पेट्रोल-डिझेल-गॅसचे दर किती वाढवू, २. लोकांची खर्चावर चर्चा कशी थांबवू, ३.तरुणांना रोजगारांची पोकळ स्वप्न कशी दाखवू, ४. आज कोणती सरकारी कंपनी विकू, ५. शेतकऱ्यांना अधिक लाचार कसं करू," असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे. याशिवाय त्यांनी #RozSubahKiBaat असा हॅशटॅगही दिला आहे.