भारत जोडो यात्रा थांबवण्यासाठी कोरोनाचा वापर केला जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी पत्र लिहून राहुल गांधींना भारत जोडो यात्रा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. हरियाणातील नूह येथे राहुल गांधी म्हणाले की, त्यांची यात्रा रोखण्यासाठी कट रचला जात आहे. यामुळे भाजपाचे लोक घाबरले आहेत. यापूर्वी अनेक काँग्रेस नेत्यांनी सांगितले होते की, भारत जोडो यात्रा थांबवण्यासाठी कोरोनाची भीती दाखवली जात आहे.
नूह येथे भारत जोडो यात्रेदरम्यान लोकांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, "त्यांनी एक नवीन कल्पना शोधून काढली आहे. मला पत्र लिहिले की, कोरोना येत आहे, यात्रा थांबवा. आता भाऊ, तुम्ही बघा, भारत जोडो यात्रा थांबवण्याचे बहाणे दिले जात आहेत. कोरोना पसरत आहे, प्रवास थांबवा मास्क घाला. हे सर्व बहाणे आहेत. हे लोक भारताच्या शक्तीला आणि सत्याला घाबरतात."
राहुल गांधी पुढे म्हणाले की, "तुम्ही बघा, मी तुम्हाला एक मजेदार गोष्ट सांगतो. आता यात्रेमध्ये आपण 100 हून अधिक दिवस चाललो आहोत. यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, प्रत्येक जाती धर्माचे लोक आहेत." राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 21 डिसेंबर रोजी मेवातमधील नूहमार्गे हरियाणात दाखल झाली होती. हरियाणातील यात्रा दोन टप्प्यात आहे. 23 डिसेंबरला ही यात्रा फरिदाबादमार्गे दिल्लीला पोहोचेल. 24 डिसेंबरला ही यात्रा दिल्लीत दाखल होणार आहे. आणि हरियाणात भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सहा जानेवारीपासून सुरू होणार आहे.
कोविड संसर्गावर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राहुल गांधींना पत्र लिहून यात्रा थांबवण्याचे आवाहन केले आहे. यात्रेचे प्रांतीय समन्वय समितीचे अध्यक्ष सलमान खुर्शीद यांनी यात्रा थांबवली जाणार नसल्याचे सांगितले आहे. पत्रकार परिषदेत खुर्शीद म्हणाले, "काँग्रेस आपल्या यात्रेमध्ये सर्वप्रथम कोरोनापासून बचावासाठीच्या सर्व खबरदारीचे पालन केले जाईल पण यात्रा थांबणार नाही." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"