Rahul Gandhi on Fuel Price Hike: “प्रधानमंत्री जन धन लूट योजना”; इंधनदरवाढीवरुन राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 12:56 PM2022-04-04T12:56:44+5:302022-04-04T12:57:37+5:30

Rahul Gandhi on Fuel Price Hike: राहुल गांधी यांनी थेट आकडेवारीच देत सर्वसामान्यांसह शेतकरी आणि मालवाहतूकदारांना महागाईचा मोठा फटका बसत असल्याचे दाखवले आहे.

congress rahul gandhi criticised centre pm modi govt over petrol diesel fuel price hike | Rahul Gandhi on Fuel Price Hike: “प्रधानमंत्री जन धन लूट योजना”; इंधनदरवाढीवरुन राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Rahul Gandhi on Fuel Price Hike: “प्रधानमंत्री जन धन लूट योजना”; इंधनदरवाढीवरुन राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Next

नवी दिल्ली: सुमारे साडे चार महिन्यांपासून स्थिर असलेले इंधनदर गेल्या पंधरवड्यापासून सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price Hike) दरांनी देशातील अनेक शहरांमध्ये शतक ओलांडले असून, यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे मालवाहतूक आणि महागाईतही मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. विरोधकांकडून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला जात असताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पेट्रोल, डिझेलसह इंधनदरवाढीवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

निवडणूक संपताच पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. या दरवाढीने देशातील अनेक शहरांत पेट्रोलने ११० रुपयांची पातळी ओलांडली आहे. तर डिझेल देखील १०० रुपयांवर गेले आहे. इंधन दरवाढीविरोधात देशभरात केंद्र सरकारविरोधात आंदोलने केली जात आहे. यातच राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

प्रधानमंत्री जन धन लूट योजना

राहुल गांधी यांनी एक ट्विट करत थेट आकडेवारीच दिली आहे. २६ मे २०१४ मध्ये जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा भाव १०८.०५ डॉलर इतका होता. ४ एप्रिल २०२२ रोजी कच्च्या तेलाचा भाव ९९.४२ डॉलर इतका आहे. ही आकडेवारी पाहता त्यांनी विविध वाहनांना पूर्ण टाकी इंधन भरणासाठी किती खर्च येईल याची आकडेवारी सादर केली आहे. या ट्विटला, प्रधानमंत्री जन धन लूट योजना असे खोचक कॅप्शन दिले आहे. 

इंधन महागाईमुळे वाहनधारकाला मोठा भुर्दंड

मे २०१४ मध्ये स्कूटर आणि मोटरसायकरची टाकी पूर्ण भरण्यासाठी ७१४ रुपये खर्च येत होता. ४ एप्रिल २०२२ रोजीचा इंधनाचा भाव पाहता वाहनधारकाला पूर्ण टाकी भरुन घेण्यासाठी १०३८ रुपये खर्च करावे लागतील. त्याला ३२४ रुपये जादा खर्च करावे लागतील. त्याशिवाय एका कारसाठी टाकी पूर्ण भरण्यासाठी सन २०१४ मध्ये २८५६ रुपये खर्च होता, तो आता थेट ४१५२ रुपये इतका वाढला आहे. इंधन महागाईमुळे वाहनधारकाला १२९६ रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. 

तर, ट्रॅक्टरची इंधन टाकी पूर्णपणे भरण्यासाठी मे २०१४ मध्ये २७४९ रुपये इतका खर्च येत होता. तोच खर्च आता ४५६३ रुपयांवर गेला आहे. यात १८१४ रुपये इंधनासाठी जादा मोजावे लागत आहे. मोठ्या ट्रकसाठी सन २०१४ मध्ये इंधन भरण्यासाठी ११४५६ रुपये इतका खर्च येत होता. ४ एप्रिल २०२२ रोजी हा खर्च १९०१४ रुपयांपर्यंत वाढला आहे. यात तब्बल ७५५८ रुपयांची वाढ झाली आहे, असा आशयाची आकडेवारी देत राहुल गांधी यांनी मालवाहतूकदार आणि शेतकऱ्यांनाही महागाईची मोठी झळ बसत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. 
 

Web Title: congress rahul gandhi criticised centre pm modi govt over petrol diesel fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.