“तरुणांची अग्निपरीक्षा घेऊ नका”; ‘अग्निपथ’ योजनेवरुन राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 05:58 PM2022-06-16T17:58:06+5:302022-06-16T17:59:22+5:30

अग्निपथावर चालवून तरुणांच्या संयमाची अग्निपरीक्षा घेऊन नका, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे.

congress rahul gandhi criticised pm modi govt over agneepath yojna | “तरुणांची अग्निपरीक्षा घेऊ नका”; ‘अग्निपथ’ योजनेवरुन राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात

“तरुणांची अग्निपरीक्षा घेऊ नका”; ‘अग्निपथ’ योजनेवरुन राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात

googlenewsNext

नवी दिल्ली: अलीकडेच मोदी सरकारने अग्निपथ नावाची नवी योजना घोषित केली आहे. मात्र, यावरून देशभरात निदर्शने केली जात असून, अनेक ठिकाणी याला हिंसक वळण लागले आहे. यातच आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी या योजनेवरून केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 

केंद्र सरकारने लष्कर, नौदल आणि वायुदलातील सैनिक भरतीसाठी अग्निपथ नावाची योजना आणली आहे. या योजनेंतर्गत युवकांना संरक्षण दलांत चार वर्षे ‘अग्निवीर’ म्हणून सेवा करण्याची संधी मिळेल असे भारत सरकारने सांगितले आहे. बिहारमध्ये लष्करात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी आंदोलन केले आहे. बिहार तसेच इतर राज्यांत या योजनेविरोधात जोरदार निदर्शने केली जात असून काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. दुसरीकडे जयपूरमध्ये १५० लोकांनी अजमेर-दिल्ली हायवे रोखून धरला होता. येथे पोलिसांनी १० आंदोलकांना ताब्यात घेतले.

तरुणाच्या संयमाची अग्निपरीक्षा घेऊ नका

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, दोन वर्षांपासून थेट भरती करण्यात आलेली नाही. चार वर्षानंतर युवकांचे भविष्य अस्थिर होईल. तसेच या काळात कोणताही रँक मिळणार नाही. तसेच कोणतेही पेंशनदेखील मिळणार नाही. सरकारकडून संरक्षण दलाच सन्मान केला जात नाही. देशातील बेरोजगार युवकांचे म्हणणे ऐकायला हवे. त्यांना अग्निपथावर चालवून त्यांच्या संयमाची अग्निपरीक्षा घेऊन नका, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे.

दरम्यान, या योजनेंतर्गत युवकांना संरक्षण दलांत चार वर्षे ‘अग्निवीर’ म्हणून सेवेची संधी मिळेल. या योजनेद्वारे भरतीमुळे व्यापक स्तरावर प्रतिभावान सैनिक संरक्षण दलांना मिळतील, असा दावा मोदी सरकारकडून केला जात आहे. ही भरती तीन महिन्यांतच सुरु होणार आहे. त्यासाठी साडेसतरा ते २१ ही वयोमर्यादा असेल. पहिल्या वर्षी अग्निवीरांना मासिक ३० हजार रुपये मोबदला मिळेल. त्यांना दुसऱ्या वर्षी ३३,०००, तिसऱ्या वर्षी ३६,५०० आणि चौथ्या वर्षी ४०,००० मोबदला मिळणार आहे. प्रत्येक अग्निवीराला ११.७१ लाख सेवानिधी मिळणार असून, हे उत्पन्न करमुक्त असेल. शिवाय, त्यांना सेवाकाळात ४८ लाखांचे विमाकवच मिळणार आहे.
 

Web Title: congress rahul gandhi criticised pm modi govt over agneepath yojna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.