नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा उद्रेक देशात झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घसरण झालेली दिसत असली, तरी वाढते मृत्यूंचे प्रमाण चिंता वाढवणारे ठरत आहे. आता याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. मृत्यूचे आकडे लपवण्यासाठी PM मोदींनी केलेला PR स्टंट आहे, या शब्दांत राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. (congress rahul gandhi criticized pm modi over corona deaths)
काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. कोरोनाची परिस्थिती, लसीकरण, ऑक्सिजन टंचाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ, सिलेंडर गॅसच्या वाढत्या किमती, व्यवस्थापन यांवरून जोरदार निशाणा साधला आहे. आता कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंवरून राहुल गांधी यांनी टीका केली असून, एक ट्विट केले आहे.
हा तर PM मोदींनी केलेला PR स्टंट
सकारात्मकता हा पंतप्रधानांचा पीआर स्टंट आहे. त्यांच्या कृतीमुळे निर्णयांमुळे झालेले करोनाचे मृत्यू झाकण्यासाठी हा करण्यात आला आहे, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान अहंकारी असल्याचा अप्रत्यक्ष टोला अलीकडेच लगावला होता. ‘एक तो महामारी, उस पर प्रधान अहंकारी’ असे ट्विट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले होते. या ट्विटसोबत त्यांनी सीरमचे कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव यांच्या आरोपांचा दाखला दिला होता.
Google कडून ७ कोटींचे बक्षीस मिळवण्याची संधी; केवळ ‘हे’ काम करा अन् मालामाल व्हा
आरोग्यमंत्र्यांचे राहुल गांधींवर टीकास्त्र
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे. हर्षवर्धन यांनी राहुल गांधींचा दिल्लीपेक्षा न्यूयॉर्कवर अधिक विश्वास आहे असे म्हटले आहे. तसेच मृतांच्या नावाने राजकारण करणे काँग्रेसच्या या गिधाडांकडून शिकावे, असे म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. राहुल गांधींनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. मृतांच्या नावाने राजकारण करणे ही काँग्रेसची स्टाईल आहे. झाडांवरील गिधाडे सध्या दिसेनासी झाली असली तर त्यांच्यातील ऊर्जा जमिनीवरील गिधाडांमध्ये आल्यासारखे वाटत आहे. राहुल गांधींचा दिल्लीपेक्षा न्यूयॉर्कवर जास्त विश्वास आहे. मृतांच्या नावाने राजकारण करणे हे जमिनीवरील 'या' गिधाडांकडून शिकावे, असे ट्विट हर्षवर्धन यांनी केले आहे.