Rahul Gandhi : "... मग भले त्यासाठी 5, 10 किंवा 15 वर्ष लागोत, तुरुंगात जाईपर्यंत आम्ही त्यांना सोडणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 12:12 PM2021-12-16T12:12:31+5:302021-12-16T12:25:13+5:30

Congress Rahul Gandhi And Narendra Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. 

Congress Rahul Gandhi says ajay mishra should resign and he has to go jail for lakhimpur kheri incident | Rahul Gandhi : "... मग भले त्यासाठी 5, 10 किंवा 15 वर्ष लागोत, तुरुंगात जाईपर्यंत आम्ही त्यांना सोडणार नाही"

Rahul Gandhi : "... मग भले त्यासाठी 5, 10 किंवा 15 वर्ष लागोत, तुरुंगात जाईपर्यंत आम्ही त्यांना सोडणार नाही"

Next

नवी दिल्ली - लखीमपूर खेरीमध्ये (Lakhimpur Kheri Case) शेतकऱ्यांवर गाडी चढवणे, हा पूर्वनियोजित कटाचा भाग होता. विशेष तपास पथकाने (SIT) ही माहिती दिली आहे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा मुख्य आरोपी आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस पथकाने आशिष मिश्रा यांच्यावरील आरोपांमध्ये सुधारणा करण्यात यावी, असे पत्र न्यायाधीशांना लिहिले आहे. आशिष मिश्रा आणि इतरांवर यापूर्वीच खून आणि कट रचण्याचे आरोप आहेत. त्यात खुनाचा प्रयत्न आणि इतर आरोपही जोडले जावेत, अशी विशेष तपास पथकाची इच्छा आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) जोरदार निशाणा साधला आहे. 

"जेव्हा मी लखीमपूर खेरीला गेलो, मी संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना वचन दिलं होतं की काहीही झालं, तरी आम्ही केंद्र सरकारवर दबाव टाकून त्यांना न्याय देऊ. अर्थात, न्याय हा दबाव आणि संघर्ष केल्याशिवाय मिळत नाही. काँग्रेसने सुरुवातीपासूनच सांगितलं होतं की,  तीन कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील आणि ते मागे घेतले गेले. त्याचप्रमाणे मी म्हणतोय की केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांना राजीनामा द्यावाच लागेल. ते तुरुंगात जाईपर्यंत आम्ही केंद्र सरकारवर दबाव टाकत राहू. मग भले त्यासाठी 5, 10 किंवा 15 वर्ष लागोत. ते तुरुंगात जाईपर्यंत आम्ही त्यांना सोडणार नाही" असं राहुल गांधी यावेळी म्हणाले आहेत.

"केंद्र सरकार यावर चर्चा करायला तयार नाही"

राहुल गांधी यांनी "हा एक कट होता. एखादा अपघात नव्हता. हा कट कुणी रचला हे अगदी उघड आहे. या प्रकरणावर संसदेत चर्चा व्हावी, अशी काँग्रेसची मागणी होती. काँग्रेसने केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. पण केंद्र सरकार यावर चर्चा करायला तयार नाही" असा गंभीर आरोप केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. राहुल यांनी काही दिवसांपूर्वी "पुन्हा एकदा माफी मागण्याची वेळ आली आहे" असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. तसेच माफी मागण्याआधी शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या आरोपीच्या वडिलांना मंत्रीपदावरून हटवा अशी मागणी देखील केली होता. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं होतं.

"मोदीजी पुन्हा एकदा माफी मागण्याची वेळ आलीय"

"मोदीजी पुन्हा एकदा माफी मागण्याची वेळ आली आहे. पण याआधी आरोपीच्या वडिलांना मंत्री पदावरून हटवा. आता सत्य सर्वांसमोर आलं आहे" असं म्हटलं होतं. तसेच Lakhimpur आणि Murder हे दोन हॅशटॅग देखील राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये वापरले होते. सत्ताधारी भाजपा यूपीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीत असताना, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यासाठी या घडामोडी मोठी डोकेदुखी ठरू शकतात. या घटनेनंतर विरोधकांकडून अजय मिश्रा यांना हटवण्याची मागणी सातत्याने होत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवले आहे. लखीमपूर खेरीच्या घटनेबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून, त्याचा परिणाम येत्या निवडणुकीत दिसून येऊ शकतो.
 

Web Title: Congress Rahul Gandhi says ajay mishra should resign and he has to go jail for lakhimpur kheri incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.