Rahul Gandhi : "जुमलों से भरा झोला लेकर, लूटे हिंदुस्तान"; पेट्रोलचा दर सांगत राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 03:27 PM2022-03-31T15:27:38+5:302022-03-31T15:41:00+5:30
Congress Rahul Gandhi And Modi Government : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्ली - पेट्रोल-डिझेलच्या किमतीत आठ दिवसांमध्ये सातवेळा वाढ झाल्याने दिल्लीसह बहुतांश राज्यांच्या राजधानीत पेट्रोलच्या किमतीने १०० रुपये प्रति लिटरचा टप्पा ओलांडला आहे, तर डिझेलही शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. गेल्या आठवडाभरापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत ४.८० रुपये प्रति लिटर वाढ झाली आहे. मंगळवारी पेट्रोलच्या दरात ८० पैसे तर डिझेलमध्ये ७० पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत १००.२१ रुपये प्रति लिटर, तर डिझेल ९१.४७ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. याच दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "प्रश्न न पूछो ‘फ़क़ीर’ से, कैमरा पर बाँटे ज्ञान। जुमलों से भरा झोला लेकर, लूटे हिंदुस्तान॥" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच जगभरातील पेट्रोलचे भाव आणि भारतातील पेट्रोलच्या दराची यादीच दिली आहे. "अफगाणिस्तानात पेट्रोलचे दर 66.99 रुपये प्रति लीटर आहे. तर पाकिस्तानात 62.38 रुपये प्रति लीटर, श्रीलंकेत 72.96 रुपये प्रति लीटर, बांग्लादेशमध्ये 78.53 रुपये प्रति लीटर, भुतानमध्ये 86.28 रुपये प्रति लीटर, नेपाळमध्ये 97.05 रुपये प्रति लीटर, तर भारतात 101.81 रुपये प्रति लीटर पेट्रोल आहे. ‘प्रश्न न पूछो ‘फ़क़ीर’ से, कैमरा पर बाँटे ज्ञान। जुमलों से भरा झोला लेकर, लूटे हिंदुस्तान॥" अशा शब्दात राहुल गांधी टीका केली आहे.
Petrol Rate in Indian Rupees (₹)
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 31, 2022
Afghanistan: 66.99
Pakistan: 62.38
Sri Lanka: 72.96
Bangladesh: 78.53
Bhutan: 86.28
Nepal: 97.05
India: 101.81
प्रश्न न पूछो ‘फ़क़ीर’ से, कैमरा पर बाँटे ज्ञान।
जुमलों से भरा झोला लेकर, लूटे हिंदुस्तान॥#MehangaiMuktBharat
केंद्र सरकारने एप्रिल ते डिसेंबर (२०२१) या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलसह पेट्रोलियम उत्पादनांवरील करातून ३.३१ लाख कोटी रुपये जमा केले आहेत. सरकारने उत्पादन शुल्कात आतापर्यंत १३ वेळा वाढ केली असून, केवळ चारवेळा हे शुल्क कमी केले आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर चढे राहिले आहेत. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, परंतु स्थानिक करानुसार त्यांच्या किमती राज्यानुसार बदलतात. मुंबई, चेन्नई व कोलकाता येथे पेट्रोलचे दर १०० रुपयाच्या पुढे गेले आहेत. बहुतांश राज्यांच्या राजधान्यांमध्ये पेट्रोलने शतकाचा टप्पा ओलांडला आहे.
"हवेवर पोट भरणाऱ्या मशीनचा शोध..."; इंधन दरवाढीवरून जितेंद्र आव्हाडांचा मोदी सरकारला टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (NCP Jitendra Awhad) यांनी मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारला अप्रत्यक्षपणे खोचक टोला लगावला आहे. "भारतातील डिझेल, पेट्रोल, गॅस, फळभाज्या, कडधान्य आणि खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या दरांचा चढता आलेख बघून अमेरिकेतील एका वैज्ञानिकाने हवेवर पोट भरणाऱ्या मशीन्सचा शोध लावला आहे. भारतीय बाजारपेठेत लवकरच ती उपलब्ध करण्याची घोषणा त्याने न्यूयॉर्कमध्ये केली आहे" असं आव्हाड यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.