देशात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत देशात दररोज साडेतीन-चार लाख नव्या कोरोनाबाधितांची नोंद होताना दिसत आहे. यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसंच यामुळे सपूर्ण जग चिंतीत झालं असल्याचं त्यांनी म्हटलं. "ज्यावेळी देशाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसत होता त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले ही लढाई जिंकण्याचं श्रेय घेतलं. आता त्यांनी तो चेंडू राज्यांकडे टोलवला," असा आरोप त्यांनी यावेळी केला. "आत्मनिर्भर बनवण्याचा उद्देश आहे. तुमच्या मदतीसाठी कोणीही येणार नाही. पंतप्रधानही येणार नाहीत. सरकारसाठी कोरोनाची स्थिती ही पूर्णपणे हाताबाहेर गेली आहे आणि आश्चर्य व्यक्त केलं जात आहे की राज्य आणि नागरिकाना आत्मनिर्भर करण्याची त्यांची ही पद्धत आहे," असं राहुल गांधी म्हणाले. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. "कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकार असमर्थ ठरलं. वैज्ञानिकांनी वेळोवेळी इशाराही दिला होता. भारत हा जगातील पहिला असा देश आहे जो तज्ज्ञांनी कोरोना विषाणूसोबत लढण्याच्या दिलेल्या सल्ल्याशिवाय या महासाथीचा सामना करत आहे. तज्ज्ञ किंवा विशेषाधिकार असलेल्या संस्थांना विषाणूचा सामना करणं आणि गरजांनुसार निर्णय घेण्याचा अधिकार, योजना तयार करण्याचा अधिकार असतो. जेणेकरून लोकांचं जिवन वाचवण्यासाठी त्वरित पावलं उचलायला हवी," असंही ते म्हणाले.निवडणुकीत व्यस्त"ते कायमच निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होता. त्यांनी विषाणूचा प्रादुर्भाव वाढवणाऱ्या कार्यक्रमांना प्रोत्साहन दिलं. गेल्या काही दिवसांमध्ये पंतप्रधान आणि गृहमंत्री सार्वजनिक ठिकाणीही विना मास्क दिसले होते. ते कोणत्या प्रकारचा संदेश देत आहेत?," असंही राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी लसींच्या किंमतीवरूनही पंतप्रधानांवर आरोप केला. उत्पादकांनी पहिले किंमत निश्चित केली आणि त्यानंतर ती कमी केली. एक प्रकारचा शो बवला आहे. सद्यस्थितीसाठी पंतप्रधान जबाबदार आहेत. ते व्यक्तीगत सरकारी व्यवस्था चालवतात. त्यांचं संपूर्ण लक्ष ब्रँडिंगवर आणि केवळ प्रतीमा चमकावण्यावर असल्याचा आरोपही त्यांनी केला.
भारतातील कोरोनाच्या परिस्थितीवरुन जग थक्क; मोदी सरकारचं प्रतीमा, ब्रँड बनवण्यावर लक्ष : राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 11:41 AM
Coronavirus In India : सरकार सुरूवातीपासून कोरोनाचा सामना करण्यास आणि समजण्यास असमर्थ ठरल्याचे राहुल गांधी यांचं वक्तव्य
ठळक मुद्देसरकार सुरूवातीपासून कोरोनाचा सामना करण्यास आणि समजण्यास असमर्थ ठरल्याचे राहुल गांधी यांचं वक्तव्ययापूर्वी श्रेय घेतलं आता चेंडू राज्यांकडे टोलवला : राहुल गांधी