नवी दिल्ली - देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 33,10,235 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 75,760 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 1,023 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 60,472 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी कोरोना, लॉकडाऊन यासह विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू असून काही लसीची चाचणी ही करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. कोरोना लसीवरून राहुल गांधी यांनी आता मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 33 लाखांचा टप्पा पार केला आहे. केंद्र सरकारचा निष्काळजीपणा चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे.
"आतापर्यंत एका निष्पक्ष आणि सर्वसमावेशक कोरोना लसीची रणनीती असायला हवी होती. मात्र अद्याप त्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीत. केंद्र सरकारचा निष्काळजीपणा चिंताजनक" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी राहुल यांनी "नोकरी हिसकावली, जमवलेले पैसेही हडपले, आजाराचा संसर्ग रोखू शकले नाही मात्र ते जनतेला खोटी स्वप्न दाखवत राहिले" असं ट्विट केलं होतं.
राहुल गांधी यांनी याआधी "4 महिन्यांत गेल्या 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या, 2 कोटी कुटुंबांचं भविष्य अंधारात" असल्याचं म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. "गेल्या 4 महिन्यांत जवळपास 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, 2 कोटी कुटुंबांचं भविष्य अंधारात आहे. फेसबुकवर खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवून बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेच्या सर्वनाशाचे सत्य देशापासून लपवता येत नाही" असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
पुरावे नष्ट करण्याचा रियाचा प्रयत्न?, सुशांतचं घर सोडण्याआधी 8 हार्ड डिस्कमधला डेटा केला डिलीट
"सोनिया गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसची खोटारडेपणाची फॅक्ट्री सुरू", भाजपाचा हल्लाबोल
CoronaVirus News : पोस्टमन ठरला व्हायरसचा 'सुपर स्प्रेडर', एकाच गावातील 100 जणांना कोरोनाची लागण