काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लडाखमध्ये मोठं विधान केलं आहे. "लडाखच्या लोकांनी मला सांगितलं आहे की, चिनी सैन्य येथे घुसलं आहे. त्यांना जी पूर्वी त्यांची ग्रेजिंग लँड होती तिथे जाता येत नाही लडाखमध्ये प्रत्येकजण हेच म्हणत आहे. एक इंचही जमीन गेली नाही असे पंतप्रधान म्हणाले आहेत, पण ते खरं नाही. तुम्ही इथे कोणालाही विचारा, तो तुम्हाला सांगेल" असं म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी "लडाखच्या लोकांच्या अनेक तक्रारी आहेत, त्यांना जो दर्जा देण्यात आला आहे त्यावर ते खूश नाहीत. त्यांना प्रतिनिधित्व हवे आहे आणि बेरोजगारीची समस्या आहे. नोकरशाहीने नव्हे तर जनतेच्या आवाजाने राज्य चालवले पाहिजे, असे लोक म्हणत आहेत" असं म्हटलं आहे.
राहुल गांधी वडील राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त लडाखला पोहोचले. पँगॉन्ग त्सो लेक येथे त्यांनी वडिलांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी भारत जोडो यात्रेच्या वेळी लडाखला जायचं होतं, मात्र काही कारणास्तव तेथे जाऊ शकलो नाही, असं सांगितलं. मग लडाखचा दौरा सविस्तरपणे करू असा विचार केला. ते लेहला गेले होते आणि पँगॉन्गनंतर आता नुब्राला जात आहे. यानंतर कारगिललाही जाणार आहेत.
शनिवारी एक दिवस आधी राहुल लडाखहून पँगॉन्गला रवाना झाले होते. यादरम्यान ते म्हणाले होते, 'माझे वडील पँगॉन्गबद्दल म्हणायचे की, ते जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे.' शनिवारी सकाळी राहुल रायडर लूकमध्ये पँगॉन्ग त्सो लेककडे रवाना झाला. राहुलच्या या साहसाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राहुल गांधी यांनीही त्यांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
युवक काँग्रेसच्या नेत्यांशीही केली चर्चा
राहुल यांनी लडाख गाठून युवा काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली. काही राजकीय लोक देशात द्वेषाचे वातावरण निर्माण करत आहेत. तुम्ही भारतात गेलात, लोकांमध्ये जा, तुम्हाला दिसेल की लोकांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर आहे असं राहुल गांधी म्हणाले होते. 20 ऑगस्ट 1944 रोजी राजीव गांधी यांचा जन्म झाला होता. काँग्रेस हा दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा करते.