जयपूर - राजस्थानात मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच पुन्हा एकदा राजकारण ढवळून निघायला सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी आरोप केला आहे, की पुन्हा एकदा राजस्थानातील सरकार पाडण्याचा खेळ सुरू होणार आहे. ते काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.
गेहलोत म्हणाले, काँग्रेस नेते अजय माकन, हे यापूर्वी भाजपकडून झालेल्या सरकार पाडण्याच्या प्रयत्नांचे साक्षिदार राहिले आहेत. या घटनेदरम्यान माकन 34 दिवस हॉटेलमध्ये आपल्या आमदारांसोबत राहिले होते.
पाच सरकारे पाडली आहेत, सहावेही पाडणार आहोत -अशोक गेहलोत यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आरोप केला, की आपल्या आमदारांना बसवून चहा पाजत होते आणि सांगत होते, की पाच सरकारे पाडली आहेत. सहावेही पाडणार आहोत. धर्मेंद्र प्रधान हे त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी न्यायाधिशांसी चर्चा करण्यासंदर्भात बोलत होते. एवढेच नाही, तर शाह यांनी आमच्या आमदारांशी तब्बल एक तास चर्चा केली, असेही गेहलोत यांनी म्हटले आहे. तसेच पाच सरकारे पाडल्यानंतर आता सहावीही पाडणार असल्याचे शाह यांनी म्हटले होते.
तेव्हा कुठे सरकार वाचले -गेहलोत म्हणाले, या घटनेदरम्यान काँग्रेस नेते अजय माकन, रणदीप सुरजेवाला, अविनाश पांडे येथे येऊन बसले आणि त्यांनी नेत्यांना बर्खास्त करण्याचा निर्णय घेतला तेव्हा कुठे सरकार वाचले. राजस्थानच्या सर्व जनतेला वाटत होते, की सरकार पडू नये. राज्यातील लोक सरकार पडू देऊ नका, असे फोन काँग्रेस आमदारांना करत होते.
भाजपच्या आडून माजी उप मुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर निशाणा - असेही म्हटले जात आहे, की मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपच्या आडून माजी उप मुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच राजस्थानात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचेही बोलले जात आहे. यामुळेच नाव न घेता सचिन पायलट यांच्यावर निशाणा साधल्याचा राजकीय अर्थ काढला जात आहे.