कोण आहेत धीरज साहू? ज्यांच्या ठिकाणांवर सापडलं होतं कोट्यवधींचं घबाड! नोटा मोजणाऱ्या मशिन्सही पडल्या होत्या बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 10:27 AM2023-12-08T10:27:45+5:302023-12-08T10:29:55+5:30

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशातील बोलंगीर आणि संबलपूर आणि झारखंडमधील रांची आणि लोहरदगामध्ये ही कारवाई करण्यात आली.

congress rajya sabha mp dheeraj sahu income tax raid cash recovered know who is he  | कोण आहेत धीरज साहू? ज्यांच्या ठिकाणांवर सापडलं होतं कोट्यवधींचं घबाड! नोटा मोजणाऱ्या मशिन्सही पडल्या होत्या बंद

कोण आहेत धीरज साहू? ज्यांच्या ठिकाणांवर सापडलं होतं कोट्यवधींचं घबाड! नोटा मोजणाऱ्या मशिन्सही पडल्या होत्या बंद

झारखंडमधीलकाँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज साहू सध्या चर्चेत आहेत. आयकर विभागाने बुधवारी तीन राज्यांतील त्याच्या अर्धा डझन ठिकाणांवर छापे टाकले. आयकर विभागाने झारखंड आणि ओडिशातील बौध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडवर (मद्य उत्पादन कंपनी) छापा टाकला आणि कंपनीशी संबंधित मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशातील बोलंगीर आणि संबलपूर आणि झारखंडमधील रांची आणि लोहरदगामध्ये ही कारवाई करण्यात आली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये करचुकवेगिरीच्या संशयावरून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी छापे टाकले होते. आयकर विभागाच्या टीमसोबत सीआयएसएफचे जवानही सामील होते. दरम्यान, या ठिकाणी कोट्यवधीची रोकड पाहून अधिकारीही आश्चर्यचकित झाले. ही रोख एकाच ठिकाणाहून जप्त करण्यात आली की एकापेक्षा जास्त हे स्पष्ट झालेले नाही. यावेळी जप्त करण्यात आलेली रोकड मोजण्यासाठी आणलेली मशीनही नोटा मोजताना बंद पडली. 

कोण आहेत धीरज साहू?
धीरज साहू यांच्याबद्दल बोलायचे झाले तर ते काँग्रेसचे नेते आहेत. ते झारखंडमधून राज्यसभेचे खासदार आहेत. धीरज साहू हे उद्योगपती आहेत. धीरज साहू यांचे बंधू शिवप्रसाद साहू हेही खासदार होते. धीरज यांचे कुटुंब स्वातंत्र्यापासून काँग्रेस पक्षाशी संबंधित आहे. धीरज साहू यांनी 1977 मध्ये राजकारणात प्रवेश केला. 1978 च्या जेलभरो आंदोलनात ते तुरुंगातही गेले होते. जून 2009 मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आले. धीरज सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. 2020 मध्ये धीरज प्रसिद्धीच्या झोतात आले होते, जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या निवडणुकीशी संबंधित याचिका फेटाळली होती. भाजपचे उमेदवार प्रदीप सोथनालिया यांनी त्यांच्या निवडणुकीला आव्हान दिले होते. 2018 मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रदीप सोनथालिया यांनी धीरज साहू यांना राज्यसभेत आव्हान दिले होते.

Web Title: congress rajya sabha mp dheeraj sahu income tax raid cash recovered know who is he 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.