- शीलेश शर्मानवी दिल्ली : भाजप व फेसबुक यांच्यातील जवळिकीबाबत काँग्रेस आक्रमक झाली आहे. पक्ष सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी फेसबुकचे चेअरमन मार्क झुकेरबर्ग यांना महिन्यात दुसरे पत्र लिहून वॉल स्ट्रीटनंतर आता टाईम मॅगझीनचा हवाला देऊन आरोप केला आहे की, फेसबुक व व्हॉटस्अॅप भारतात सत्तारूढ भाजपच्या राजकीय हितांचे संरक्षण करीत आहे व या दोन्ही सोशल मीडियावर भाजपचेच नियंत्रण आहे.वेणुगोपाल यांनी पत्रात म्हटले आहे की, आपल्या संस्थेतील अनेक लोक भाजपला मिळालेले आहेत. देशातील ४० कोटींपेक्षा अधिक लोक व्हॉटस्अॅपचा वापर करीत असून, त्यांना आपल्या संस्थेचे लोक भाजप हितांसाठी प्रभावित करीत आहेत. कोणत्याही विदेशी कंपनीने सोशल मीडियाचा दुरुपयोग करू नये, यासाठी कायदेशीर इलाज करील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.पक्ष प्रवक्ते पवन खेडा यांनी मागील दहा दिवसांत घडलेल्या घडामोडींचा उल्लेख करून म्हटले आहे की, विदेशी वृत्तपत्रे व नियतकालिकांत याबाबत मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर हा मुद्दा आंतरराष्टÑीय स्तरावर गेला आहे. त्यांनी अंकिता दास यांच्यानंतर आता शिव नाथ ठुकराल यांच्यावर आरोप केला आहे की, टाईम मॅगझिननुसार, त्यांचे भाजपशी लागेबांधे आहेत.२०१४ च्या निवडणुकीनंतर मोदी यांनी जी टीम तयार केली होती, त्यात ठुकराल यांची भूमिका होती. अलेक्स स्टामॉस यांचा उल्लेख करताना म्हटले आहे की, जेव्हा नियुक्त्या सत्ताधारी पक्षाच्या हस्तक्षेपातून होतील, तेव्हा अशा प्रकारचे झुकते माप देणे स्वाभाविक आहे.पवन खेडा यांनी म्हटले आहे की, फेसबुक व व्हॉटस्अॅप जे काही भारतात करीत आहे, ती १३० कोटी भारतीयांशी धोकेबाजी आहे. फेसबुक लोकांचा डाटा भाजपला उपलब्ध करून देत आहे. अखेर हे सर्व कोणाच्या दबावातून सुरू आहे, असा सवालही त्यांनी केला.राहुल गांधी यांचे टीकास्त्रकाँग्रेस व फेसबुकच्या लढाईत राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. त्यांनी टष्ट्वीटद्वारे म्हटले आहे की, अमेरिकी टाईम मॅगझिनने व्हॉटस्अॅप व भाजपच्या संबंधांचा पर्दाफाश केला. ४० कोटी भारतीय व्हॉटस्अॅपचा वापर करतात व आता त्यावरून पैशाचे व्यवहार व्हावेत, असे व्हॉटस्अॅपला वाटतेय. त्यासाठी मोदी सरकारची स्वीकृती गरजेची आहे. यासाठी भाजपची व्हॉटस्अॅपवर पकड आहे.
काँग्रेसचे फेसबुकवर पुन्हा टीकास्त्र : झुकेरबर्ग यांना लिहिले दुसरे पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 4:22 AM