"AAP आणि TMC सोबत युतीत काँग्रेस लहान भाऊ बनण्यास तयार"; पी चिदंबरम यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 02:06 PM2022-03-18T14:06:09+5:302022-03-18T14:09:52+5:30

Congress P Chidambaram And AAP, TMC : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनीही पक्षातील संघटनात्मक कमकुवतपणा दूर करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

congress ready to be junior partner with tmc and aap in 2024 lok sabha election p chidambaram | "AAP आणि TMC सोबत युतीत काँग्रेस लहान भाऊ बनण्यास तयार"; पी चिदंबरम यांचं मोठं विधान

"AAP आणि TMC सोबत युतीत काँग्रेस लहान भाऊ बनण्यास तयार"; पी चिदंबरम यांचं मोठं विधान

Next

नवी दिल्ली - पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस नेत्यांच्या बैठकी सुरू आहेत. याच दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम (P Chidambaram) यांनीही पक्षातील संघटनात्मक कमकुवतपणा दूर करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. तसेच त्यांनी काँग्रेस पक्ष 2024 मधील लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेससोबत युती करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. "काँग्रेस 2024 च्या लोकसभा निवडणुका तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी सारख्या पक्षांसोबत युती करून लहान भाऊ म्हणून लढण्यासाठी सज्ज आहे."

"2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी त्यांचा पक्ष आवश्यक असल्यास तडजोड करण्यास तयार आहे. ही तडजोड फक्त काँग्रेसच करेल असं नाही, तर प्रत्येक पक्षाला करावी लागेल. हे ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनाही लागू होते. हा लढा राज्या-राज्यात होणार आहे. बंगालमध्ये आपल्याला तृणमूलच्या नेतृत्वाखाली लढावं लागणार आहे. पंजाबमध्ये ‘आप’च्या नेतृत्वाखाली लढावं लागणार आहे. भाजपा विरोधात राज्या-राज्यात लढल्यास त्यांचा पराभव करणे शक्य आहे" असा विश्वास चिदंबरम यांनी व्यक्त केला.

"काँग्रेसच्या नवीन अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया वेगवान करण्याची गरज"

"पाच राज्यांमध्ये निवडणुकीत झालेल्या पराभवाला केवळ गांधी कुटुंबाला जबाबदार धरणं योग्य नाही. पराभवानंतर सोनिया गांधी यांनी रविवारी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह पक्षाच्या पदांचा राजीनामा देण्याची ऑफर दिली होती. परंतु कमिटीने हे मान्य केले नाही. आता आमच्याकडे कोणता पर्याय आहे? काँग्रेसच्या नवीन अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया वेगवान करण्याची गरज आहे. पण ते ऑगस्ट महिन्यात शक्य होईल" असंही पी. चिदंबरम  यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

चिदंबरम यांचा प्रियंका गांधींवर अप्रत्यक्ष निशाणा

चिदंबरम यांनी अप्रत्यक्षरित्या पक्षाच्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यावर टीका केली. "गेल्या काही वर्षांमध्ये उत्तर प्रदेशात पक्षाची कामगिरी चांगली झालेली नाही हे सर्वांनाच माहित आहे," असं चिदंबरम म्हणाले. यावेळी त्यांनी निवडणुकीतील पराभवासाठी गांधी कुटुंबीयांना जबाबदार धरलं जाऊ शकत नाही, असंही म्हटलं. एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. "उत्तर प्रदेशच्या प्रभारी लोकांनी एकाच वेळी पक्षाची पुनर्बांधणी आणि दुसरा निवडणूक लढवणं ही दोन कामं करण्याचे प्रयत्न केले. ही दोन्ही कामं एकाच वेळी होऊ शकत नाही असा इशारा मी त्यांना आधीच दिला होता. पक्षाची पुनर्बांधणी आधी व्हायला हवी आणि निवडणुकांमध्ये जाणं नंतरही होऊ शकतं. परंतु दुर्देवानं पक्षाची पुनर्बांधणी आणि निवडणूक एकाच वेळी झाली," असं ते म्हणाले.

Web Title: congress ready to be junior partner with tmc and aap in 2024 lok sabha election p chidambaram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.