हैदराबाद : काँग्रेस सत्तेत आल्यास आम्ही या राज्यात जातनिहाय जनगणना करू असे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिले आहे. काँग्रेसने आयोजिलेल्या विजयाभेरी यात्रेदरम्यान भूपालपल्लीहून पेद्दपल्लीला जात असताना राहुल गांधी यांनी विविध ठिकाणी नुक्कड सभा घेतल्या. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले.
ते म्हणाले की, जातनिहाय जनगणना हा देशातील महत्त्वाचा मुद्दा आहे. दलित, आदिवासी, ओबीसींची नेमकी स्थिती काय आहे याचा ही जनगणना म्हणजे एक्स-रे ठरणार आहे. तेलंगणातील जनतेची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अशी जनगणना झाली पाहिजे. ९० वरिष्ठ सनदी अधिकारी संपूर्ण देशाचा कारभार खऱ्या अर्थाने चालवितात, असे ते म्हणाले.
‘मजूर, महिलांची कर्जे माफ होत नाहीत’राहुल गांधी यांनी सरकारवर टीका करताना सांगितले की, देशातले अग्रगण्य उद्योगपतींची अब्जावधी रुपयांची कर्जे माफ करण्यात येतात. मात्र मजूर, महिला, युवक आदींनी घेतलेली कर्जे कधीच माफ करण्यात येत नाहीत.