ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. २४ - शहीद भगतसिंग यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने काँग्रेसने पुन्हा एकदा सावरकरांवर टीका करत त्यांचा देशद्रोही म्हणून उल्लेख केला आहे. 'जेव्हा भगतसिंग इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी लढा देत होते तेव्हा सावरकर इंग्रजांकडे त्यांचा गुलाम होण्यासाठी दयेची भीक मागत होते', असं ट्विट काँग्रेसने केलं आहे. सोबतचं भगतसिंग आणि सावरकरांचा फोटोदेखील वापरण्यात आला आहे. ज्यामध्ये सावकरांच्या फोटोवर देशद्रोही असं लिहिण्यात आलं आहे.
सावकरांना आदर्श मानणा-या भारतीय जनता पक्ष (भाजपा) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्यावर काँग्रेसने ही अप्रत्यक्ष टीका केली आहे. भगत सिंग यांनी इंग्रजांविरोधात हिंमत दाखवली आणि भाजपा-आरएसएसचे आदर्श सावकरांनी दयेची भीक मागितल्याचं काँग्रेसने म्हंटलं आहे. संसदेच्या शेवटच्या आठवड्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहलु गांधी यांनी सावरकरांवर टीका करत सत्ताधारी पक्ष त्यांच्या स्वताच्या विचारांवर चालतो तर काँग्रेस पक्षाचा मार्ग गांधीजींनी दाखवला असल्यांचं म्हंटलं होतं.
याअगोदरही काँग्रसेने सावकरांवर नकली म्हणत टीका केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर हे नकली देशभक्त होते अशी उघड टिप्पणी काँग्रेसने त्यांच्या टि्वटर अकाउंटवर केली होती. ज्यावेळी चंद्रशेखर आझाद भारतासाठी प्राणांची आहुती देत होते त्यावेळी सावरकर ब्रिटिशांकडे दयेची भीक मागत होते असे या टि्वटमध्ये नमूद करण्यात आले होते.
Bhagat Singh waged war for Freedom from British RajVD Savarkar begged for mercy, to be a slave in British Raj pic.twitter.com/Pr9p16CNtV— INC India (@INCIndia) March 23, 2016
Bhagat Singh dared the British Raj to send the executioners.BJP-RSS ideologue Savarkar begged for his own release pic.twitter.com/QLQFW9puoy— INC India (@INCIndia) March 23, 2016