लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पाचवी यादी प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 12:38 AM2019-03-19T00:38:28+5:302019-03-19T00:39:22+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीसाठा काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पाचवी यादी रात्री प्रसिद्ध केली. पाचव्या यादीत आंध्र प्रदेश, तेलंगाणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम आणि लक्षद्वीप येथील एकूण 56 उमेदवारांचा समावेश आहे.
नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीसाठा काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पाचवी यादी रात्री प्रसिद्ध केली. पाचव्या यादीत आंध्र प्रदेश, तेलंगाणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम आणि लक्षद्वीप येथील एकूण 56 उमेदवारांचा समावेश आहे.
केंद्रातील मोदी सरकारविरोधात एक देशव्यापी आघाडी उभी करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. मात्र बहुतांश राज्यांमध्ये अशी आघाडी उभी करण्यात अपयश आल्यानंतर काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पाचव्या यादीमध्ये आंध्र प्रदेशमधील 22, आसाममधील पाच, ओदिशामधील सहा, तेलंगाणामधील आठ, उत्तर प्रदेशमधील तीन, पश्चिम बंगालमधील 11 आणि लक्षद्वीपमधील एका मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पाचव्या यादीत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजित मुखर्जी यांनी जंगीपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर अधीर रंजन चौधरी बेहरामपूर येथून उमेदवारी देण्यात आली आहे.
Congress party releases fifth list of 56 candidates for upcoming #LokSabhaElections2019 . Madhu Yashki Goud to contest from Nizamabad, Telangana, N Uttam Kumar Reddy from Nalgonda. Abhijit Mukherjee to contest from Jangirpur, West Bengal & Adhir Ranjan Chowdhary from Berhampore. pic.twitter.com/CwhKfRerGi
— ANI (@ANI) March 18, 2019
दरम्यान, ओदिशामधील विधानसभा निवडणुकीसाठीही काँग्रेसकडून 36 उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली.
Congress party releases list of 36 candidates for elections to the Odisha legislative assembly. pic.twitter.com/HixKZ0AmSH
— ANI (@ANI) March 18, 2019