"आम्ही कधीच भाजपासोबत तडजोड केली नाही", नितीश कुमार यांच्या सल्ल्यावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 02:49 PM2023-02-19T14:49:08+5:302023-02-19T14:50:12+5:30
देशातील आगामी सार्वत्रिक निवडणुकीबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठं विधान केलं होतं.
नवी दिल्ली-
देशातील आगामी सार्वत्रिक निवडणुकीबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठं विधान केलं होतं. भारत जोडो यात्रेनंतर आता काँग्रेसनं उभारी घ्यायला हवी आणि पुढाकार घेऊन विरोधकांची मोट बांधण्यासाठी उशीर करू नये, असं नितीश कुमार म्हणाले होते. त्यावर आता काँग्रेस नेत्यानं प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, विरोधकांची एकजूट महत्वाची आहेच आणि याच दृष्टीकोनातून काँग्रेसनं भारत जोडो यात्रा काढली होती. आम्हाला आमची भूमिका अतिशय योग्यरित्या ठावूक आहे. काँग्रेस एकमेव पक्ष असा आहे की ज्यानं कधीच भाजपासमोर तडजोड केली नाही. आमचा एकच चेहरा आहे आणि आम्ही भाजपासमोर ताकदीनं उभे आहोत.
विरोधकांच्या एकजुटीबाबत बोलताना जयराम रमेश पुढे म्हणाले की भारत जोडो यात्रे सामील होण्यासाठी सर्व पक्षांना निमंत्रण दिलं गेलं होतं. यात्रेनंतर आता परिवर्तन पाहायला मिळत आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन होऊ लागली आहेत. काँग्रेसच्या मजबुतीकरणाशिवाय विरोधी पक्षांची एकी होणं शक्य नाही. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची ताकद खूप चांगली आहे.