काँग्रेस म्हणते, आयोगाने निकाल अपडेट करायला उशीर लावला; आयोग म्हणतो, आरोपात तथ्य नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 10:39 AM2024-10-09T10:39:43+5:302024-10-09T10:41:33+5:30
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केलेले हे आरोप निवडणूक आयोगाने निराधार म्हणत फेटाळून लावले.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : आयोगाच्या संकेतस्थळावर हरयाणा निवडणूक निकालाबद्दल अपडेट करण्यास विलंब होत असल्याबद्दल काँग्रेसने नाराजी व्यक्त करत तक्रार केली. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केलेले हे आरोप निवडणूक आयोगाने निराधार म्हणत फेटाळून लावले.
सकाळी ९ ते ११ दरम्यान आयोगाच्या संकेतस्थळावर निकाल अपडेट करण्याचा वेग खूपच कमी होता, असे जयराम रमेश यांनी म्हटले. त्यावर आयोगाने म्हटले की, नियुक्त अधिकाऱ्यांद्वारे नियमांचे पालन करून मतमोजणी केली जात आहे. हरयाणा, जम्मू-काश्मीरमधील मतमोजणी प्रक्रिया उमेदवार, निरीक्षक आणि सूक्ष्म निरीक्षकांच्या उपस्थितीत नियमानुसार केली जात आहे. निकाल अद्ययावत करण्यात उशीर झाल्याचा तुमचा निराधार आरोप सिद्ध करण्यासाठी रेकॉर्डवर काहीही नाही. त्यात कोणतेही तथ्य नाही.