काँग्रेस म्हणते, नरेंद्र मोदी औरंगजेब बादशाहपेक्षा अधिक क्रूर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 03:15 PM2018-06-26T15:15:51+5:302018-06-26T15:50:43+5:30
आणीबाणीवरून इंदिरा गांधी यांच्यावर टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे.
नवी दिल्ली - आणीबाणीवरून इंदिरा गांधी यांच्यावर टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. दिल्लीवर राज्य करणाऱ्या औरंगजेब बादशाहपेक्षा अधिक क्रूर हुकूमशाह असणाऱ्या नरेंद्र मोदींनी आज देशाला 43 वर्षांपूर्वीच्या आणीबाणीबाबत माहिती दिली, अशा शब्दात काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदींना लक्ष्य केले.
1975 साली देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला आज 43 वर्षे पूर्ण झाली. आणीबाणीच्या कटू आठवणींना उजाळा देण्यासाठी सत्ताधारी भाजपाने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईतील कार्यक्रमात सहभागी होऊन आणीबाणीवरून काँग्रेसला लक्ष्य केले. त्याला काँग्रेसनेही चोख प्रत्युत्तर दिले. मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेताना काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, "दिल्लीवर राज्य करणाऱ्या औरंगजेब बादशाहपेक्षा अधिक क्रूर हुकूमशाह असणाऱ्या नरेंद्र मोदींनी आज देशाला 43 वर्षांपूर्वीच्या आणीबाणीबाबत माहिती दिली. पण काँग्रेसवर टीका करून मोदी आपल्या पोकळ आश्वासनांवर पडदा घालू शकतात का?"
Delhi sultanate ke Aurangzeb se bhi zyada kroor tanashah Modi ji ne desh ko 43 saal pehle ke aapatkal (Emergency) ka paath padhaya. Kya Congress par bhadaas nikaalne se Modi ji ke jumlon pe parda dal sakta hai?: Randeep Surjewala, Congress pic.twitter.com/fZRsdSfxHa
— ANI (@ANI) June 26, 2018