'काँग्रेस म्हणते, जेवढी लोकसंख्या तेवढा अधिकार...; मग हिंदूंनी त्यांचा अधिकार घ्यावा?' PM मोदींचा थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 05:35 PM2023-10-03T17:35:07+5:302023-10-03T17:35:49+5:30
"देशाच्या साधनसंपत्तीवरील अधिकाराचा प्रश्न असेल, तर गरिबांचा पहिला अधिकार..."
बिहारमधील जातवार जनगणनेची आकडेवारी समोर आल्यानतंर संपूर्ण देशात राजकारण तापले आहे. देशातही जातवार जनगणना करण्यात यावी, अशी मागणीही सुरू झाली आहे. यातच, आता छत्तीसगडमधील बस्तर येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, लोकसंख्येनुसार अधिकारांच्या मागणीवरून काँग्रेसवर थेट हल्ला चढवला. "मनमोहन जी तर म्हणत होते, देशातील साधनसंपत्तीवर पहिला अधिकार अल्पसंख्यकांचा आहे आणि त्यातही पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. मग आता काँग्रेस अल्पसंख्याकांना धोका देऊ इच्छित आहे का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
मोदी म्हणाले "काँग्रेस म्हणत आहे की, ज्यांची जेवढी संख्या, त्यांना त्यानुसार अधिकार मिळावा. मग या देशात सर्वाधिक लोकसंख्या कुणाची आहे? आता काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, देशातील हिंदूंनी आपला अधिकार त्याच प्रमाणात घ्यावा का? या नुसार तर, देशातील साधन संपत्तीवर पहिला अधिकार देशातील हिंदूंचा आहे. हिंदूंमध्ये फूट पाडून देश बर्बाद करण्याची काँग्रेसची इच्छा आहे."
#WATCH | Chhattisgarh: At Bastar's Jagdalpur PM Modi says, "Since yesterday, Congress leaders are saying 'jitni aabadi utna haq'... I was wondering what the former Prime Minister Manmohan Singh would be thinking. He used to say that the minority has the first right to the… pic.twitter.com/m3KqCikIS4
— ANI (@ANI) October 3, 2023
"गरीब जरी सामान्य श्रेणीतील असला तरी माझ्यासाठी गरीब सर्वांपेक्षा वरचा आहे. काँग्रेसला लोकांमध्ये फूट पाडायची आहे. काँग्रेसने केवळ गरिबी दिली आणि देशाचे तुकडे करण्याचे काम केले. देशातील हिंदूंमध्ये फूट पाडून काँग्रेसला देश उद्ध्वस्त करायचा आहे. काँग्रेसचे नेते आता काँग्रेस पक्ष चालवत नाहीत. अनुभवी नेत्यांचे मत विचारात घेतले जात नाही. देशविरोधी शक्तींशी हातमिळवणी करणारे लोक काँग्रेस चालवत आहेत आणि लोकांच्या भावनांशी खेळत आहेत," असा आरोपही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला.
"काँग्रेसने आजपर्यंत दुसऱ्या देशासोबत कोणता गुप्त करार केला आहे हे उघड केलेले नाही, पण देश पाहतोय की या करारानंतर काँग्रेसने देशावर आणखी टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यांना भारतातील कोणत्याच गोष्टी आवडत नाहीत, असे दिसते. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या या नव्या षडयंत्रापासून लोकांनी सावध राहायला हवे. देशाच्या साधनसंपत्तीवरील अधिकाराचा प्रश्न असेल, तर गरिबांचा पहिला अधिकार आहे," असे मोदी म्हणाले.