डेहराडून : उत्तराखंडमधील काँग्रेस नेते आणि माजी मंत्री हरकसिंह रावत यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली असून दिल्ली, चंदीगड आणि उत्तराखंडमध्ये छापे टाकले जात आहेत. या तीन राज्यांमध्ये 16 ठिकाणी ईडीचे छापे सुरू आहेत.
ईडीचे हे छापे दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सुरू आहेत. त्यापैकी एक वनजमिनीशी संबंधित आहे आणि दुसरा जमीन घोटाळा आहे. ज्यामध्ये गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हरक सिंह रावत यांच्यावर दक्षता विभागाने कारवाई केली होती.
दरम्यान, 2022 मध्ये भाजपाने पक्षविरोधी कारवायांमुळे हरकसिंह रावत यांना मंत्रिमंडळ आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून 6 वर्षांसाठी बडतर्फ केले होते. यानंतर हरकसिंह रावत यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
2016 मध्ये हरकसिंह रावत यांच्यासह एकूण 10 आमदारांनी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांच्याविरोधात बंड करून भाजपमध्ये प्रवेश केला होता.