कधीही पाकिस्तानात गेलो नाही, हे माझं भाग्य: गुलाम नबी आझाद
By देवेश फडके | Published: February 9, 2021 01:54 PM2021-02-09T13:54:10+5:302021-02-09T13:56:06+5:30
गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपुष्टात आला. आझाद यांच्यासह चौघांना सभागृहात निरोप देण्यात आला. त्यावेळी निरोपाच्या भाषणावेळी ते बोलत होते.
नवी दिल्ली : आम्ही त्या नशीबवान लोकांपैकी एक आहोत, जे कधीही पाकिस्तानात गेले नाहीत, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गुलाम नबी आझाद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपुष्टात आला. आझाद यांच्यासह चौघांना सभागृहात निरोप देण्यात आला. त्यावेळी निरोपाच्या भाषणावेळी ते बोलत होते. (congress senior leader ghulam nabi azad shared experience in rajya sabha at farewell)
गुलाम नबी आझाद यांनी निरोपाच्या भाषणावेळी सांगितले की, आम्ही त्या नशीबवान लोकांपैकी आहोत, जे कधीही पाकिस्तानात गेले नाहीत. पाकिस्तानातील परिस्थिती पाहिली की, भारतीय मुसलमान असल्याचा मला अभिमान वाटतो. एवढेच नव्हे, तर मी असे म्हणेन की, जगात जर कोणत्या मुस्लिमांना अभिमान वाटायला हवा, तर तो भारतीय मुस्लिमांना वाटायला हवा, असे आझाद यांनी नमूद केले.
I am among those fortunate people who never went to Pakistan. When I read about circumstances in Pakistan, I feel proud to be a Hindustani Muslim: Congress MP Ghulam Nabi Azad in his retirement speech in RS pic.twitter.com/0nmJdkMWI8
— ANI (@ANI) February 9, 2021
गेल्या ३० ते ३५ वर्षात अफगाणिस्तानपासून ते इराकपर्यंत आपण पाहतोय की, मुस्लिम एकमेकांशी लढत संपत चालले आहेत. तिथे तर हिंदूही नाहीत, ख्रिश्चनही नाहीत, दुसरे कुणी लढत नाहीत. ते आपसातच लढत आहेत, असेही ते म्हणाले.
"भारतरत्नांच्या चौकशीचे आदेश मागे घ्या, अन्...", राम कदमांचे गृहमंत्र्यांना पत्र
जम्मू काश्मीरचा मुख्यमंत्री झालो, तेव्हा पहिली बैठक सोपोरमध्ये घेतली होती. गिलानी दोन ते तीन वेळा या भागातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यावेळी झालेल्या बैठकीत मी म्हणालो होतो की, माझ्या सरकारमधील कोणताही मंत्री धर्म वा मशिद किंवा पक्षाच्या आधारावर न्यायनिवाडा करेल, तर मला लाज वाटेल की, मी या मंत्र्यासोबत काम करतोय, असे आझाद यांनी सांगितले. दरम्यान, १५ फेब्रुवारी २०२१ रोजी गुलाम नबी आझाद यांच्यासह इतर तीन खासदारांचा कार्यकाळ संपत आहे.