Gurudas Kamat Death :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे शेवटचे ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 11:19 AM2018-08-22T11:19:05+5:302018-08-22T11:30:24+5:30
Gurudas Kamat : गुरुदास कामत यांचे हे ट्विट ठरले अखेरचे...
नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे बुधवारी (22 ऑगस्ट) सकाळी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. वयाच्या 63व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, मंगळवारी रात्री गुरुदास कामत यांनी ट्विटरवरुन बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांचं हे ट्विट अखेरचं ठरले आहे. 'ईद-उल-अज्हा-मुबारक' असं ट्विट करत गुरुदास कामत यांनी रात्री 11.44 वाजता बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर काही तासांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आला, तातडीनं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. चाणक्यपुरीतील प्रायमस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
(काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं निधन)
#EidMubarak to all my friends celebrating #EidAlAdha . May all your prayers be accepted. May peace, joy and happiness never depart from your lives and homes.
— Gurudas Kamat (@KamatGurudas) August 21, 2018
Happy celebrations! #ईद_उल_अजहा के पुरमुस्सर्रत मौके पर आप सभी को तहे दिल से मुबारकबाद। #ईद_मुबारकpic.twitter.com/WfXX4dc6k9
दरम्यान, मुंबईमध्ये काँग्रेसला मोठे करण्यासाठी गुरुदास कामत यांनी मोलाची भूमिका बजावली होती. गेल्याच वर्षी त्यांनी काँग्रेसच्या सर्वच पदांचा राजीनामा दिला होता. गुरुदास कामत हे सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या फारच जवळच होते.
काँग्रेसनं त्यांच्याकडे गुजरात, राजस्थान, दादरा आणि नगर हवेली, दिव दमन या राज्यांची जबाबदारी सोपवली होती. गेल्या वर्षी त्यांचं मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहिलेल्या संजय निरुपम यांच्याबरोबर वाद झाले होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या सर्वच पदांचा राजीनामा दिला होता. गुरुदास कामत ब-याचदा काँग्रेसकडून लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते. मुंबईतल्या पश्चिम उपनगरांत त्यांचं प्राबल्य होतं.
1972मध्ये त्यांनी विद्यार्थी चळवळीतून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर 1976ला त्यांनी एनएसयूआयचे अध्यक्षपदही भूषवलं. 1984ला ते पहिल्यांदा काँग्रेसकडून लोकसभेवर निवडून गेले. 2009 ते 2011मध्ये यूपीए सरकारमध्ये राज्यमंत्री होते. तसेच त्यांनी केंद्रीय गृहखातं आणि दूरसंचार मंत्रालयाचा अतिरिक्त भारही सांभाळला होता. 2014च्या निवडणुकीत शिवसेनेच्या गजानन कीर्तिकरांकडून त्यांचा पराभव झाला होता.
Senior Congress leader Gurudas Kamat passes away in a hospital in Delhi. pic.twitter.com/7FI0WLJTFk
— ANI (@ANI) August 22, 2018
Delhi: Sonia Gandhi arrives at Primus Hospital where senior Congress leader Gurudas Kamat passed away this morning. pic.twitter.com/uT8RDwEJ5e
— ANI (@ANI) August 22, 2018