नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांच्यानंतर आता काँग्रेसच्या (Congress) इतरही काही मोठ्या नेत्यांचे ट्विटर (twitter) अकाउंट लॉक झाले आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजय माकन (Ajay Makan), काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala), लोकसभेतील पक्षाचे व्हीप माणिकम टागोर, आसाम काँग्रेस प्रभारी जितेंद्र सिंह आणि महिला काँग्रेस अध्यक्षा सुष्मिता देव यांचे ट्विटर अकाउंट लॉक झाले असल्याचा आरोप कांग्रेसने केला आहे. (Congress senior leaders randeep surjewala ajay makan twitter handles locked)
यासंदर्भात बोलताना काँग्रेस नेते अजय माकन म्हणाले, ट्विटरने माझेही अकाउंट लॉक केले आहे. कारण मीही महिला आणि दलित अत्याचाराविरोधात राहुल गांधी यांचे समर्थन केले होते. लवकरच खरे 'अच्छे दिन' येतील आणि तुम्ही (ट्विटर) घाबरणार नाही. ही माझी भविष्यवाणी आहे.
यावरून, काँग्रेसच्या कम्युनिकेशन डिपार्टमेंटचे प्रमुख प्रणव झा यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, लॉर्ड नरेंद्र मोदी, जॅक आणि ट्विटरने रणदीप सुरजेवाला, अजय माकन, सुष्मिता देव यांची ट्विटर खाती लॉक केली आहेत. काँग्रेसने आपला निषेध नोंदवला आहे. सर्वांवरील अन्यायाविरोधात लढाई सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे
राहुल गांधींचेही अकाउंट झाले आहे सस्पेंड -काँग्रेसने आरोप केला आहे, की ट्विटरने सरकारच्या दबावात येऊन काँग्रेस नेते राहू गांधी यांच्या अकाउंटवर अॅक्शन घेतली आहे. गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार आणि बलात्कार पीडितेच्या कुटुंबासोबतचे फोटो ट्विट केले होते.