... तर Petrol ३० रूपये, हे Tweet डिलीट करून कुठे चाललात?; काँग्रेसचा Baba Ramdev यांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 09:16 AM2021-10-21T09:16:57+5:302021-10-21T09:17:24+5:30
Petrol-Diesel च्या वाढत्या दरावरून काँग्रेसनं साधला योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्यावर निशाणा. काँग्रेसनं केलं त्यांचं जुनं ट्वीट शेअर.
पेट्रोल-डिझेल(Petrol-Diesel Price)च्या किंमती दररोज नवा विक्रम करत आहेत. देशांतर्गत तेल कंपन्यांनी आज म्हणजेच २१ ऑक्टोबरसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी केले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ३५ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. बुधवारीही दिल्लीसह देशातील सर्व राज्यांमध्ये इंधनाचे दर वाढवण्यात आले होते. सतत वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी सामान्य माणसाचे कंबरडं मोडलं आहे. दरम्यान, यावरून जुनं ट्वीट शेअर करत कांग्रेसनं (Congress) योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्यावर निशाणा साधला आहे.
युथ काँह्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांनी बुधवारी बाबा रामदेव यांचं ९ वर्ष जुन्या ट्वीटचा एक स्क्रिनशॉट शेअर केला. देशात काळा पैसा (Black Money) परत आला तर पेट्रोल ३० रूपये प्रति लीटर दरानं मिळेलं असं बाबा रामदेव यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. ९ ऑगस्ट २०१२ मध्ये त्यांनी हे ट्वीट केलं होतं. या स्क्रीनशॉटनुसार त्यांनी हे ट्वीट डिलीट केल्याचं म्हटलं आहे. "ट्वीट डिलीट करून तुम्ही कुठे चाललात," असा टोलाही त्यांनी याद्वारे लगावला आहे.
ये 'Tweet' डिलीट करके कहाँ चल दिये? pic.twitter.com/TfjmmDTJiI
— Srinivas BV (@srinivasiyc) October 20, 2021
गुरूवारीही इंधन दरवाढ
- दिल्ली - पेट्रोल १०६.५४ रुपये आणि डिझेल ९५.२७ रुपये प्रति लिटर
- मुंबई - पेट्रोल ११२.४४ रुपये आणि डिझेल १०३.२६ रुपये प्रति लिर
- चेन्नई - पेट्रोल १०३.६१ रुपये आणि डिझेल ९९.५९ रुपये प्रति लिटर
- कोलकाता - पेट्रोल १०७.११ रुपये आणि डिझेल ९८.३८ रुपये प्रति लिटर
ऑक्टोबरमध्ये ५ रुपयांनी वाढ
आतापर्यंत ऑक्टोबर महिन्यात इंधनाचे दर १५ पटींपेक्षा जास्त वाढवण्यात आले आहेत. फक्त तीन दिवस वगळता दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. ऑक्टोबरमध्येच पेट्रोल ४.८० रुपयांनी महाग झाले आहे, तर डिझेल ५ रुपयांनी वाढले आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असताना, पेट्रोल आणि डिझेलचे दरही सातत्याने वाढत आहेत.