शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

आउट होऊनही काँग्रेसला सतत हवी असते बॅटिंग- पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 5:59 AM

भारताचे तुकडे काँग्रेसनेच केले. तुमच्या पापाची किंमत देशाला मोजावी लागत आहे. सरदार पटेल पंतप्रधान असते, तर काश्मीर भारताच्या ताब्यात असता, अशी आरोपवजा टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संसदेत केली.

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : भारताचे तुकडे काँग्रेसनेच केले. तुमच्या पापाची किंमत देशाला मोजावी लागत आहे. सरदार पटेल पंतप्रधान असते, तर काश्मीर भारताच्या ताब्यात असता, अशी आरोपवजा टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संसदेत केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावर बोलताना, मोदींनी दोन्ही सभागृहांत दीड तासांची भाषणे केली. त्या वेळी सभागृहांत काँग्रेस, तेलगू देसमसह अन्य विरोधकांची घोषणाबाजी व गदारोळ सुरू होता.त्यानंतर, काँग्रेसचे नेते आनंद शर्मा म्हणाले की, मोदींच्या भाषणांचा बाज निवडणूक प्रचाराचा होता. गांधी-नेहरू परिवार व काँग्रेसच्या ५५ राजवटीवर, टीका करताना, आपली कारकिर्द संपत आल्याचे ते विसरून गेले. ज्या मुद्द्यांवर त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढविला, त्यापैकी एकाही विषयाचे उत्तर मोदींना ४ वर्षांत शोधता आले नाही.मोदी म्हणाले, यूपीए सरकार असताना सरकारी बँकांचा १८ लाख कोटींचा एनपीए ५२ लाख कोटींवर गेला. बँकांची ही लूट कोणी घडविली? हे पाप आमच्या सरकारचे नाही. आमच्या काळात बँकांनी एकही असे कर्ज दिले नाही की, ज्यामुळे बँकांच्या एनपीएमध्ये भर पडली.>सभागृहांमध्ये रणकंदनपंतप्रधानांचे भाषण सुरू असताना दोन्ही सभागृहांत सत्ताधारी विरुद्ध विरोधक असे रणकंदनच सुरू होते.मोदींच्या प्रत्येक मुद्द्यावर सत्ताधारी सदस्य बाके वाजवून विरोधकांना खिजवायचे, तर काँग्रेससह अन्य विरोधक या वेळी ‘पंतप्रधान मोदी जुमलेबाजी बंद करो’, ‘झूठा भाषण बंद करो, मॅच फिक्सिंग बंद करो’, ‘आंध्र प्रदेशके मुद्देपर ड्रामेबाजी बंद करो’, ‘धमकी देना बंद करो, झांसा देना बंद करो’, ‘राफेल डिल मे क्या हुवा?; अशा घोषणा देत होते. या गोंधळातच पंतप्रधानांचे भाषण पार पडले.> राक्षसी हास्यबोलण्याच्या ओघात मोदींनी आधार कार्ड संकल्पनेचे श्रेय लालकृष्ण अडवाणींना दिले, तेव्हा काँग्रेसच्या रेणुका चौधरी जोरात हसू लागल्या.सभापती नायडू त्यांच्या हास्यावर नाराजी व्यक्त करीत असतानाच त्यांना थांबवून मोदी यांनी ‘रामायण’ या मालिकेनंतर बºयाच वर्षांनी असे हास्य ऐकायला मिळाले,’ असा कडवट शेरा मारून, चौधरी यांच्या हसण्याची तुलना राक्षसी हास्याशी केली.>मलाही हवा गांधीजींचाच भारतराज्यसभेत पंतप्रधान म्हणाले की, ‘आउट झाल्यावरही काँग्रेसला सतत बॅटिंग हवी असते. ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत अनेक वर्षे सत्ता काँग्रेसकडे होती. मात्र, त्याचे सारे श्रेय एका कुटुंबालाच दिल्याने तो पक्ष आज विरोधी बाकांवर आहे. यंग इंडियाचे स्वप्न स्वामी विवेकानंदांनीही पाहिले होते. विरोधकांना न्यू इंडिया नको असेल, तर ठीक आहे, मलाही गांधींचा भारत हवा आहे, पण काँग्रेसमुक्त भारत ही काही माझी कल्पना नव्हती. स्वातंत्र्य मिळाल्यावर गांधींनीच तशी इच्छा व्यक्त केली होती. आता देशाने ठरवावे की, त्यांना कोणता भारत हवाय.’>बेनामी संपत्ती पकडलीआपल्या प्रदीर्घ भाषणात केंद्र सरकारने रेल्वेचे बजेट रद्द का केले, ३,५00 कोटींची बेनामी संपत्ती प्रथमत: कशी पकडली, शेतीसाठी राबविलेल्या विविध योजना, शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प, बांबूच्या शेतीला प्रोत्साहन, उज्ज्वला योजना, तीन तलाक विधेयक, स्वच्छ भारत अभियान इत्यादी योजनांच्या यशाचा पंतप्रधानांनी आवर्जून उल्लेख केला.>दलाल व मध्यस्थ संपविलेचुकीच्या धोरणांमुळे देशाचे किती नुकसान झाले, याची उदाहरणे सांगताना काँग्रेसवर हल्ला चढविण्याची एकही संधी मोदींनी सोडली नाही. ते म्हणाले, आधार कार्डाचा उपयोग आम्ही वैज्ञानिक रितीने केला. काँग्रेस राजवटीत विधवा, दिव्यांग, ज्येष्ठांची पेन्शन दलालांच्या खिशात जात होती. आम्ही दलाल व मध्यस्थ संपविले. भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांतही १ कोटीहून अधिक लोकांना रोजगार मिळाला. विरोधक त्यालाही खोटे ठरविणार काय?

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस