काँग्रेसच्या 'त्या' खराब कामगिरीवर संजय राऊत रोखठोक बोलले; महाविकास आघाडी सरकारमध्ये ठिणगी?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 01:41 PM2021-02-24T13:41:46+5:302021-02-24T13:42:52+5:30

ShivSena MP Sanjay Raut on congress performance in gujarat municipal election: संजय राऊतांच्या विधानाचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याची शक्यता

congress should think about its performance in gujarat municipal election says shiv sena mp sanjay raut | काँग्रेसच्या 'त्या' खराब कामगिरीवर संजय राऊत रोखठोक बोलले; महाविकास आघाडी सरकारमध्ये ठिणगी?

काँग्रेसच्या 'त्या' खराब कामगिरीवर संजय राऊत रोखठोक बोलले; महाविकास आघाडी सरकारमध्ये ठिणगी?

Next

मुंबई: गुजरातमधील महापालिका निवडणुकांमध्ये (Gujarat Municipal Election Results 2021) भारतीय जनता पक्षानं (BJP) शानदार विजय मिळवला. भाजपनं सहापैकी सहा महापालिका आपल्याकडे कायम राखल्या आहेत. एकूण ५७५ पैकी ४८३ जागा जिंकत भाजपनं महापालिका निवडणुकीत आपला करिश्मा दाखवून दिला. विशेष म्हणजे आम आदमी पक्षानं निवडणुकीत चांगलं यश मिळवलं. मात्र काँग्रेसची (Congress) कामगिरी अतिशय निराशाजनक झाली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत (ShivSena MP Sanjay Raut) यांनी भाष्य केलं आहे.

गुजरातमध्ये भाजप सुस्साट, 'आप'ची एन्ट्री ठरली काँग्रेससाठी ताप; MIM कडे मतदारांची पाठ

काँग्रेस पक्षाची अवस्था अशी का, याचा विचार पक्षानं करायला हवा. गुजरातच्या जनतेनं आपल्याला का नाकारलं याबद्दल काँग्रेसनं मंथन करायला हवं, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. 'सूरत एक महत्त्वाची महापालिका आहे. तिथे आम आदमी पक्ष विरोधी पक्षात बसेल. गुजरातमध्ये आपनं प्रवेश केला आहे आणि एका महत्त्वाच्या पालिकेत त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळालं आहे. याचा विचार काँग्रेसनं करायला हवा,' असं राऊत म्हणाले.

सुरतमध्ये काँग्रेसला भोपळा, केजरीवालांचा 'आप' ठरला प्रमुख विरोधी पक्ष

'गुजरातमधील कामगिरीचा विचार काँग्रेस पक्षाला करावा लागेल. आम्हा सगळ्यांना करावा लागेल. आपला चांगलं यश मिळालं आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. पण काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाला जनतेनं नाकारलं आहे. गुजरात असो वा इतर राज्यं, काँग्रेसला अपेक्षित मिळताना दिसत नाही. काँग्रेसचं याप्रकारे होणारं पतन लोकशाहीसाठी योग्य नाही,' असं राऊत यांनी म्हटलं.

काँग्रेसला धक्का; आप, एमआयएमचा गुजरातमध्ये प्रवेश
महापालिका निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसला असताना आप आणि एमआयएमला चांगलं यश मिळालं आहे. भाजपनं अहमदाबाद, सूरत, वडोदरा, राजकोट, जामनगर आणि भावनगरमधील सत्ता कायम राखली आहे. सहा महापालिकांमध्ये मिळून काँग्रेसला केवळ ५५ जागा जिंकता आल्या. सूरतमध्ये तर काँग्रेसला खातंही उघडता आलं नाही. तर आपनं २७ जागा जिंकल्या. त्यामुळे आप सूरत महापालिकेत विरोधी पक्ष असेल.

Web Title: congress should think about its performance in gujarat municipal election says shiv sena mp sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.