काँग्रेसनं केसीआर-ओवेसींना PM मोदींच्या हातातील कठपुतळ्या म्हणून दाखवलं, ठिकठिकाणी लावले होर्डिंग्स
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 08:59 PM2023-11-11T20:59:07+5:302023-11-11T21:01:25+5:30
काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या इतर दोन विरोधकांचीही खिल्ली उडवत, नव-नवे होर्डिंग लांबवले आहेत.
हैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणूक 2023 (Telangana Assembly Elections 2023) साठी सर्वच पक्षांकडून जबरदस्त प्रचार सुरू आहे. यातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शनिवारी होणाऱ्या दौऱ्यापूर्वीच, काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या इतर दोन विरोधकांचीही खिल्ली उडवत, काही होर्डिंग लांबवले आहेत.
या होर्डिंग्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) अध्यक्ष के चंद्रशेखर राव (KCR) आणि मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना हातातील कठपुतळ्यांच्या स्वरुपात वापरताना दाखवण्यात आले आहे.
कोठे लावण्यात आले आहे होर्डिंग? -
काँग्रेस पक्षाने एचआयटीईसी सिटीसह काही मुख्य ठिकाणी 'कठपुतळ्या' लावल्या आहेत. खरे तर बीआरएस आणि एमआयएमची भाजप सोबत मिलीभगत असल्याचा आरोप, काँग्रेसने यापूर्वीही केला आहे.
बीआरएसची काँग्रेससोबत थेट टक्कर -
तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांसाठी 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. बीआरएसला सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याची आशा आहे. तेलंगणामध्ये त्यांचा सामना काँग्रेससोबत आहे.