"देश नहीं बिकने दूंगाच्या घोषणा देत एक एक करुन सर्व सरकारी मालकीची संपत्ती विकतंय मोदी सरकार"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 08:26 AM2021-03-16T08:26:16+5:302021-03-16T08:29:09+5:30

Congress And Modi Government Over Bank Strike : मोदी सरकार हळूहळू एक एक सरकारी संपत्ती विकत आहे. त्यामुळेच आज बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

Congress slams Modi Government over privatisation of banks and 2 days strike | "देश नहीं बिकने दूंगाच्या घोषणा देत एक एक करुन सर्व सरकारी मालकीची संपत्ती विकतंय मोदी सरकार"

"देश नहीं बिकने दूंगाच्या घोषणा देत एक एक करुन सर्व सरकारी मालकीची संपत्ती विकतंय मोदी सरकार"

googlenewsNext

नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी बँक कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांनी दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे. सोमवारी या संपात राज्यातील 50 हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. संपामुळे शहरी, ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांना फटका बसला आहे. याच दरम्यान संपावरुन आता काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मोदी सरकार हळूहळू एक एक सरकारी संपत्ती विकत आहे. त्यामुळेच आज बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

"आज बँक कर्मचारी संप करत आहेत तर उद्या दुसरं कोणी तरी असेल. कोणत्याही परिस्थितीत थांबवायला हवं" असं काँग्रेसने म्हटलं आहे. काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करत भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. "देश नहीं बिकने दूंगाच्या घोषणा देणाऱ्यांविरोधात आज बँकेच्या कर्चमाऱ्यांनी संप पुकारला आहे. उद्या दुसरं कोणीतरी पुकारले. कारण एक एक करुन सर्व सरकारी मालकीची संपत्ती मोदी सरकार विकत आहे. हे कोणत्याही परिस्थितीत थांबवायला हवं" असं काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटसोबत एक फोटो देखील पोस्ट करण्यात आला आहे.

फोटोमध्ये एका बाजूला मोदी "देश नहीं बिकने दूंगा"च्या घोषणा देत आहेत तर दुसरीकडे खासगीकरण थांबवा असे फलक हातात घेऊन आंदोलन करणाऱ्या महिला असलेल्या पाहायला मिळत आहेत. तसेच ज्यांनी काहीही विकणार नाही अशी शपथ घेतली होती ते आज एक एक करुन सर्व गोष्टी विकत आहेत असं वाक्यही या फोटोवर लिहिण्यात आलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी IDBI Bank सह आणखी दोन सरकारी बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली आहे. याला बँक कर्मचाऱी संघटनांनी जोरदार विरोध केला आहे. यूएफबीयूच्या सदस्यांमध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन,  नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक इम्प्लॉइज,  ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, बँक एम्प्लॉइज कन्फेडरेशन ऑफ इंडिया आदी संघटना सहभागी आहेत. 

बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे  आर्थिक व्यवहारांना फटका, राज्यातील ५० हजार बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे निमंत्रक देवीदास तुळजापूरकर म्हणाले, देशभरातील एक लाखापेक्षा जास्त बँक शाखांमध्ये काम करणारे 10 लाख बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी दोन दिवसांच्या संपाची सुरुवात केली. 10 हजारांहून जास्त शाखांतून काम करणारे 50 हजारांहून अधिक बँक कर्मचारी आणि अधिकारी या संपात सहभागी झाले होते. यात सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकातील सफाई कर्मचारी सहभागी झाल्यामुळे बँकांचे दरवाजे उघडले गेले नाहीत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनची एक बैठक या आठवड्यात अपेक्षित आहे, ज्यात बँक खासगीकरणाच्या विरोधातील आंदोलन तीव्र करण्याविषयी निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Congress slams Modi Government over privatisation of banks and 2 days strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.