"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 02:49 PM2024-05-02T14:49:04+5:302024-05-02T15:24:39+5:30
Lok Sabha Elections 2024 : ट्विटद्वारे राधिका खेडा यांनी माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर निशाणा साधल्याचे मानले जात आहे.
रायपूर : छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या राधिका खेडा यांच्यासोबत झालेल्या कथित गैरवर्तनाचे प्रकरण जोर धरत आहे. रिपोर्ट्सनुसार, राधिका खेडा यांनी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर कथित गैरवर्तनावरून मोठा हल्लाबोल केला आहे. दीदी (प्रियांका गांधी) यांचे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम यांच्या मातृगृहात स्वागत आहे, असे राधिका खेडा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले आहे. तसेच, या ट्विटद्वारे राधिका खेडा यांनी माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर निशाणा साधल्याचे मानले जात आहे.
काल सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये कथितरित्या राधिका खेडा फोनवर कोणाशी तरी बोलत होत्या. फोनवर त्या स्वत:सोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप करत होत्या. "माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही. माझा अपमान झाला आहे. मला ओरडले गेले आहे. मीही पक्षाचा राजीनामा देत आहे", असे राधिका खेडा म्हणत होत्या. दरम्यान, हा व्हिडिओ रायपूरमधील काँग्रेस कार्यालयातील असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर गेल्या दोन दिवसांत त्यांनी एक्सवर जे काही लिहिले आहे ते पाहता पक्षांतर्गत वाद असल्याचे दिसून येते.
‘दुशील’ को लेकर ‘कका’ का मोह
— Radhika Khera (@Radhika_Khera) May 2, 2024
एक लड़की की इज़्ज़त से बढ़कर है
लेकिन,
लड़की हूँ, “लड़ रही हूँ”
“मर्यादा पुरुषोत्तम” प्रभु श्री राम जी के ननिहाल में दीदी का स्वागत है 😔
याचबरोबर, "कौशल्या मातेच्या घरी मुली सुरक्षित नाहीत, दुष्ट मानसिकतेने ग्रासलेले लोक आजही मुलींना पायाखाली चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत. मी खुलासा करीन", असे राधिका खेडा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. तर दुसऱ्या पोस्ट म्हटले आहे की, "नारी, तू कमजोर नाहीस, स्वतःची ताकद ओळख. आपल्या हक्कांसाठी लढ, तरच उन्नती होईल. महिला का लाचार आहेत, त्यांची लाज का लुटली जाते. आज ही पृथ्वी पुरुषार्थापासून वंचित झाली आहे का?". दरम्यान, काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी छत्तीसगडच्या दौऱ्यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या राधिका खेरा यांनी एक्सवर आपले दुख: शेअर केले आहे.