नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात काँग्रेसचे राजघाटावर आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 05:36 PM2019-12-23T17:36:57+5:302019-12-23T17:38:48+5:30

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशात मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे.

Congress is staging protest against Citizenship Amendment Act | नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात काँग्रेसचे राजघाटावर आंदोलन 

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात काँग्रेसचे राजघाटावर आंदोलन 

Next

नवी दिल्ली - केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशात मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे. काही ठिकाणी हिंसक आंदोलनेही होत आहेत. दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आज काँग्रेसने महात्मा गांधींचे समाधीस्थळ असलेल्या राजघाट येथे आंदोलन केले. यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी,  माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. 



यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि राहुल गांधी यांनी घटनेची प्रस्तावना वाचून दाखवली. तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मध्य प्रदेशमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू केली जाणार नसल्याची घोषणा केली. 



राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध केला. हा कायदा लोकशाहीसाठी धोका आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कायद्यावरून देशवासियांची दिशाभूल करत आहेत. केंद्राचा अजेंडा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आहे. अशी टीका गहलोत यांनी केली. 

Web Title: Congress is staging protest against Citizenship Amendment Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.