वाराणसी : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात (सीएए)निदर्शने करणाऱ्या व त्यामुळे अटक झालेल्या लोकांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष भक्कमपणे उभा आहे असे त्या पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.उत्तर प्रदेशमध्ये या निदर्शनांदरम्यान जे ठार, जखमी किंवा अटकेत आहेत त्यांच्या कुटुंबीयांची प्रियांका गांधी भेट घेत आहेत. वाराणसीतील बेनिया भागामध्ये १९ डिसेंबर रोजी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात निदर्शने करणाºया बनारस हिंदू विद्यापीठाच्या १२ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. हे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह ५९ जणांची नुकतीच जामीनावर मुक्तता करण्यात आली असून त्यांच्याशी प्रियांका गांधी यांनी शुक्रवारी संवाद साधला. प्रियांका गांधी यांनी सांगितले की, शांततेने निदर्शने करणाऱ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई अन्यायकारक आहे.>मंदिरात घेतले दर्शन : उत्तर प्रदेशच्या दौºयावर असलेल्या प्रियांका गांधी यांनी शुक्रवारी वाराणसी येथील काशी विश्वेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. १८ महिन्यांच्या बाळाची आई असलेल्या व सामाजिक कार्यकर्त्या एकता शेखर यांनाही पोलिसांनी निदर्शने केल्याबद्दल अटक केली होती. एकता यांची प्रियांका गांधी यांनी भेट घेतली.
सीएएविरोधातील निदर्शकांना काँग्रेसचा पाठिंबा- प्रियंका गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 5:41 AM