"गुजरातमधील मोदी सरकार पाडण्यासाठी अहमद पटेलांनी दिले होते लाखो रुपये;" सोनिया गांधींसंदर्भातही मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 11:17 AM2022-07-19T11:17:40+5:302022-07-19T11:18:49+5:30
Rais Khan Pathan Attacks Teesta Setalvad: दिवंगत काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी कुण्या नरेंद्र भ्रमभट्ट यांच्याकडून हे पैसे घेऊन तीस्ता यांना दिले होते. एवढेच नाही, तर फंड कधीही कमी पडणा नाही, केवळ उद्देश लक्षात ठेवा. मोदींना जेलमध्ये बंद करा आणि सरकार पाडा, असेही अहमद पटेल यांनी म्हटले होते.
सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाडचे माजी सहकारी रईस खान पठाण यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, मी आणि तीस्ता यांनी सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती. तेव्हा सोनिया गांधी यांनी तिस्ता यांना, निधीची काही कमतरता तर नाही ना? असा सवाल केला होता. एवढेच नाही, तर पठाण यांनी सोनिया गांधी यांच्या एसआयटी चौकशीचीही मागणी केली आहे.
आपण तिस्ता सेटलवाड आणि अहमद पटेल यांच्यातील डीलचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहोत, असा दावा रईस खान पठान यांनी केला आहे. झी न्यूजसोबत बोलताना पठान यांनी मोठा खुलासा करताना दावा केला आहे, की गुजरातमधील तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठी आणि भाजप सरकार पाडण्यासाठी सुरुवातीच्या काळात त्यावेळी 5 लाख आणि 48 तासांनंतर 25 लाख रुपये रोख देण्यात आले होते.
दिवंगत काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी कुण्या नरेंद्र भ्रमभट्ट यांच्याकडून हे पैसे घेऊन तीस्ता यांना दिले होते. एवढेच नाही, तर फंड कधीही कमी पडणा नाही, केवळ उद्देश लक्षात ठेवा. मोदींना जेलमध्ये बंद करा आणि सरकार पाडा, असेही अहमद पटेल यांनी म्हटले होते. तसेच अहमद पटेल यांची मुलगी मुमताज पटेल यांनी केलेला दावा पूर्णपणे चुकीचा आहे, असा दावाही पठान यांनी केला आहे.
पठान पुढे म्हणाले, आपण 2008 मध्ये तिस्ता यांच्यापासून दूर झाल्यानंतर, अहमद पटेल यांना दोन भेटून यासंदर्भात तक्रार केली होती. मात्र तेव्हा पटेल म्हणाले होते, की जे काही होत आहे, ते आमच्याच इशाऱ्यावर होत आहे. आपण दूर रहा.
सोनिया गांधींनी विचारले निधीची कमतरता तर नाही? -
रईस खान पठान यांनी पुढे दावा केला, की दिल्ली येथे सोनिया गांधी यांच्या निवास्थानीही तिस्ता आणि आपली त्यांच्याशी भेट झाली होती. तेव्हा सोनिया गांधी यांनी निधीची काही कमतरता तर नाही ना? असा प्रश्न तिस्ता यांना विचारला होता. यावर तिस्ता यांनी उत्तर दिले होते, नाही अहमद पटेल यांच्या आशीर्वादाने सर्वकाही भेटत आहे.