शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
4
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
5
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
6
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
7
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
8
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
9
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
10
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
11
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
12
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
13
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
14
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
15
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
16
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
17
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
18
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
19
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
20
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती

तेलंगणात काँग्रेसला सत्ता; पण, मोहम्मद अझहरुद्दीनचा १६ हजारांनी पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 12:55 IST

मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील विधानसभांच्या निकालात भाजपने सत्ता काबिज केली.

हैदराबाद - देशातील ५ राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून आज मिझोरमचा निकाल समोर येत आहेत. ५ पैकी ४ राज्यांच्या निकालात भाजपने आघाडी घेत ३ राज्यात सत्ता स्तापन केली. तर, तेलंगणा राज्यातही भाजपला चांगलं यश मिळालं आहे. मात्र, तेलंगणातील भारत राष्ट्र समितीचा सत्तेतून पायउतार व्हावे लागले. येथे काँग्रेसने स्पष्ट बहुमत जिंकत विजय मिळवला. त्यानंतर, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपला राजीनामा दिला आहे. आता, लवकरच तेलंगणात काँग्रेसचा मुख्यमंत्री शपथ घेईल. काँग्रसने तेलंगणात लक्षणीय यश मिळवले आहे. मात्र, माजी क्रिकटपटू आणि काँग्रेस उमेदवार मोहम्मद अझहरुद्दीन यांना पराभव पत्कारावा लागला.   मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील विधानसभांच्या निकालात भाजपने सत्ता काबिज केली. तर, तेलंगणात ११९ जागांपैकी ६४ जागा जिंकत काँग्रेसने सत्ता मिळवली. मात्र, येथील ज्युबिली हिल्स मतदारसंघात काँग्रेस उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझहरुद्दीनला पराभवाचा सामना करावा लागला. 

हैदराबादमधील ज्युबिली हिल्स विधानसभा मतदारसंघातून मोहम्मद अजहरुद्दीन यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली. गत २०१८ साली या जागेवर टीआरएस पक्षाचे मंगती गोपीनाथ विजयी झाले होते. १६,००४ मतांनी काँग्रेसच्या विष्णूवर्धन रेड्डी यांचा पराभव करत ते आमदार बनले होते. यावेळीही, त्यांनी मोहम्मद अजहरुद्दीनचा १६ हजारांपेक्षा अधिक मताधिक्क्याने पराभव केला आहे. या मतदारसंघातून ते दुसऱ्यांदा आमदार बनले आहेत. गोपीनाथ यांनी ८०,५४९ मतं घेत अझहरुद्दीन यांचा पराभव केला. अझहरुद्दीनला ६४,२१२ मतं मिळाली असून त्यांचा १६,३३७ मतांनी पराभव झाला आहे. निवडणुकांपूर्वी माध्यमांशी बोलताना त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, मंगती गोपीनाथ यांचं पारडं पुन्हा एकदा जड असल्याचं सिद्ध झालं.  

अझहरुद्दीनने यापूर्वी २००९ मध्ये उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली होती. त्यानंतर, २०१४ साली राजस्थानच्या टोंक-सवाई माधोपूर मतदारसंघात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. २०१९ साली कुठलिही निवडणूक न लढवता, अजहरुद्दीनने यंदाच्या २०२३ मध्ये विधानसभा मैदानात नशिब आजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या नशिबी पराभव आला.  

दरम्यान, तेलंगणात गत २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत तेलंगणात चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसने ११९ पैकी ८२ जागा जिंकत बाजी मारली होती. मात्र, यंदाची परिस्थिती वेगळी असून बदलात्मक निकाल समोर येण्याची शक्यता वर्तवली जात होती, त्याचप्रमाणे निकाल लागला आहे. 

भाजपाचे १ वरुन ८ जागांवर यश

आगामी २०२४ च्या लोकसभेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. तेलंगणात काँग्रेसने लक्षवेधी विजय मिळवत बहुमत आपल्या पारड्यात पाडलं. तर, केसीआर यांच्या बीआरएस पक्षाला ३९ जागाच जिंकता आल्या. भाजपालाही गतवर्षीच्या तुलनेत चांगलं यश मिळालं असून भाजपने १ वरुन ८ जागांवर विजय मिळवला आहे.   

टॅग्स :telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३Electionनिवडणूकcongressकाँग्रेसhyderabad-pcहैदराबाद