'भारत बंद'ला काँग्रेस, तृणमूल आणि 'टीआरएस'ने जाहीर केला पाठिंबा; मोदी सरकारची कोंडी

By मोरेश्वर येरम | Published: December 6, 2020 03:05 PM2020-12-06T15:05:04+5:302020-12-06T15:06:53+5:30

दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज ११ वा दिवस आहे. कडाक्याच्या थंडीचा विचार न करता पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या मांडून आहेत.

Congress Trinamool and TRS support Bharat Bandh | 'भारत बंद'ला काँग्रेस, तृणमूल आणि 'टीआरएस'ने जाहीर केला पाठिंबा; मोदी सरकारची कोंडी

'भारत बंद'ला काँग्रेस, तृणमूल आणि 'टीआरएस'ने जाहीर केला पाठिंबा; मोदी सरकारची कोंडी

Next
ठळक मुद्देशेतकरी संघटनांनी ८ डिसेंबर रोजी पुकारला आहे 'भारत बंद'विरोधी पक्षांचा 'भारत बंद'ला पूर्णपणे पाठिंबादेशभर काँग्रेसच्या कार्यालयात केलं जाणार मोदी सरकारविरोधात निदर्शन

नवी दिल्ली
नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या ८ डिसेंबर रोजीच्या 'भारत बंद'लाकाँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि तेलंगणा राष्ट्रा समिती (टीआरएस) या पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे मोदी सरकारसमोर आता मोठी कोंडी निर्माण झाली आहे. 

दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज ११ वा दिवस आहे. कडाक्याच्या थंडीचा विचार न करता पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या मांडून आहेत. विरोधी पक्षांनी 'भारत बंद'ला पाठिंबा जाहीर केला असताना दुसरीकडे शेतकरी संघटनांच्या नेत्यांचीही बैठक सुरू आहे. आंदोलनाबाबतची पुढची रणनिती ठरविण्यासाठी शेतकरी संघटनांचे नेते चर्चा करत आहेत. 

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी आज शेतकऱ्यांनी पुकारलेल्या 'भारत बंद'ला काँग्रेस पक्ष पूर्णपणे समर्थन देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. "आम्ही आंदोलनाच्या समर्थनार्थ पक्षाच्या कार्यालयात प्रदर्शन करू. यामुळे राहुल गांधी यांचे शेतकऱ्यांसाठीचे समर्थन अधिक बळकट होईल", असं पवन खेडा म्हणाले. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि टीआरएसचे अध्यक्ष के.चंद्रशेखर राव यांनीही 'भारत बंद'ला पाठिंबा जाहीर केला आहे. तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनेही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे. तृणमूल काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे आणि भारत बंदमध्ये पक्ष पूर्ण सहकार्य करेल, असे तृणमूलचे खासदार सुदीप बंडोपाध्याय यांनी सांगितलं आहे.
 

Web Title: Congress Trinamool and TRS support Bharat Bandh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.