काँग्रेसचा महाराष्ट्रातील तरुण नेतृत्वावर विश्वास, कर्नाटक निवडणुकीसाठी पाठविले १५ निरीक्षक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 08:59 AM2023-04-16T08:59:11+5:302023-04-16T09:00:21+5:30

Congress: पुढील महिन्यात होणाऱ्या कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसने ६६ जणांना निरीक्षक म्हणून नियुक्त केले असून, यात महाराष्ट्रातील १५ तरुण नेत्यांवर विश्वास दाखविला आहे. 

Congress trusts young leadership in Maharashtra, sends 15 observers for Karnataka elections | काँग्रेसचा महाराष्ट्रातील तरुण नेतृत्वावर विश्वास, कर्नाटक निवडणुकीसाठी पाठविले १५ निरीक्षक

काँग्रेसचा महाराष्ट्रातील तरुण नेतृत्वावर विश्वास, कर्नाटक निवडणुकीसाठी पाठविले १५ निरीक्षक

googlenewsNext

 नवी दिल्ली : पुढील महिन्यात होणाऱ्या कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसने ६६ जणांना निरीक्षक म्हणून नियुक्त केले असून, यात महाराष्ट्रातील १५ तरुण नेत्यांवर विश्वास दाखविला आहे. 
अ. भा. काँग्रेस समितीने प्रकाशित केलेल्या ६६ जणांच्या यादीत राज्यातील १५ नेत्यांचा समावेश आहे. प्रामुख्याने तरुण नेतृत्वाचा यादीत समावेश आहे. यामध्ये माजी मंत्री अमित देशमुख, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, चरणजित सिंग छापरा, हुस्नबानो खलिफे, मुज्जफर हुसेन, आमदार रितुराज पाटील, आमदार संग्राम थोपटे, आमदार विकास ठाकरे, माजी आमदार सुनील देशमुख, माजी मंत्री विश्वजित कदम, आमदार झिशान सिद्दीकी, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, यांचा समावेश आहे. बंगळुरू शहरासाठी असलेल्या निरीक्षकामध्ये माजी खासदार संजय निरुपम यांचाही समावेश आहे.

Web Title: Congress trusts young leadership in Maharashtra, sends 15 observers for Karnataka elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.