'काँग्रेस नेहमीप्रमाणेच संवेदनशील मुद्द्याच घाणेरडं राजकारण करतंय'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 09:35 AM2020-10-19T09:35:06+5:302020-10-19T09:35:43+5:30
काँग्रेस नेहमीप्रमाणेच संवेदनशील मुद्द्यावर घाणेरडं राजकारण करत आहे. येथील सभेसाठी मी पोहोचण्यापूर्वीच आपल्या अन्नदाता शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता
भोपाळ - मध्य प्रदेशातील 28 जागांवर पोटनिवडणूक होत आहे, त्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळींच्या प्रचार दौऱ्यांना गर्दी होत आहे. नेते मंडळींच्या सभांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या झडलेल्या फैरी ऐकण्यासाठीही मतदार एकत्र येत आहेत. यावरुन भाजपा नेते आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. भाजापा नेते ज्योतिर्रादित्य शिंदेंच्या सभेदरम्यान, एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यावर, ज्योतिर्रादित्य शिंदेंनी काँग्रेसवर हल्लाबोल करत स्पष्टीकरण दिलंय.
बीजेपी के कार्यक्रम में किसान की मौत,
— MP Congress (@INCMP) October 18, 2020
—बीजेपी की भाषणबाज़ी फिर भी जारी रही;
आज बीजेपी के कार्यक्रम में एक किसान की मौत हो गई लेकिन बीजेपी के बेशर्म नेताओं ने कार्यक्रम नहीं रोका। किसान की लाश पड़ी रही और बेशर्म भाजपाई ताली बचाते रहे।
शिवराज जी,
जनता से न सही, भगवान से तो डरो..! pic.twitter.com/GuFo2n0nqQ
खंडवा जिल्ह्यातील मंधाता विधानसभा मतदारसंघात भाजपा नेते ज्योतिर्रादित्य शिंदे यांची सभा होणार होती. तत्पूर्वी या सभेला हजेरी लावलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेवरुन राजकारण तापल्याचं दिसून येतय. मंधाता विधानसभा मतदारसंघात भाजपाचे स्टार प्रचारक ज्योतिर्रादित्य शिंदे यांच्या सभेपूर्वी तेथील स्थानिक नेत्यांची भाषणे सुरु होती. यादरम्यान, एका 80 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर वयोवृद्ध आजोबांशेजारील खुर्च्या रिकाम्या झाल्या, लोकं तेथून निघून गेली. मात्र, तरीही नेतेमंडळींचं भाषण सुरूच होतं, असा आरोप काँग्रेसने केला आहे. मध्य प्रदेश काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरुन शिंदे यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय. आता, शिंदे यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन काँग्रेसला जशास तसे उत्तर दिलंय.
आज मांधाता विधानसभा क्षेत्र के मुंदी में भाजपा उम्मीदवार श्री नारायण पटेल जी के समर्थन में जनसभा को संबोधित किया।
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) October 18, 2020
क्षेत्र की मेरे परिवार की जनता के अपार स्नेह और आशीर्वाद के लिए आप सभी का धन्यवाद एवं आभार। pic.twitter.com/FbEI2NSYMr
काँग्रेस नेहमीप्रमाणेच संवेदनशील मुद्द्यावर घाणेरडं राजकारण करत आहे. येथील सभेसाठी मी पोहोचण्यापूर्वीच आपल्या अन्नदाता शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. कार्यकर्त्यांना तत्काळ या शेतकऱ्यास रुग्णालयात दाखलही केले होते. मी सभास्थानी पोहोचल्यानंतर मला या घटनेसंदर्भात माहिती मिळाली. त्यावेळी, सर्वप्रथम मी अन्नदाता शेतकऱ्यांस श्रद्धांजली वाहत मौन धारण केले. माझ्यासाठी राजकारण हे समाजसेवेचं माध्यम आहे, आणि त्यासाठी मला काँग्रेसकडून प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही, अशा शब्दात भाजपा नेते ज्योतिर्रादित्य शिंदेंनी काँग्रेसवर निशाणा साधला.