ऑनलाइन लोकमत
डेहराडून, दि. ११ - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तराखंड विधानसभेतील शक्तिपरीक्षेत काँग्रेसच विजयी झाली असून हरीश रावत यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उत्तराखंडमधील हा पराभव भाजपा आणि मोदी सरकारला मात्र मोठी चपराक मानली जात आहे. अॅटर्नी जनरल मुकू रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती सादर केली असून उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट आजच उठवण्यात येईल, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले.
मंगळवारी उत्तराखंड विधासभेत ही बहुमत चाचणी पार पडली, तेव्हाच काँग्रेसने विजयाचा दावा केला होता. हरीश रावत यांच्या बाजूने ३३ तर भाजपाच्या बाजूने २८ मते मिळाली.
मात्र मतदानाच्या आधी काँग्रेसच्या रेखा आर्य भाजपाच्या गटात दाखल झाल्या, तर भाजपाने निलंबित केलेले बंडखोर आ. भीमलाल आर्य काँग्रेसच्या कळपात गेले. बसपा तसेच अन्य चार सदस्यांनी रावत यांच्या बाजूनेच मतदान केले. काँग्रेसचे २७ व हे ६ मिळून ३३ हा जादुई आकडा मिळवण्यात रावत सरकार यशस्वी ठरले.
AG to SC: It has been proved Harish Rawat has got majority on the floor of house #uttarakhand— ANI (@ANI_news) May 11, 2016
Centre tells SC, we will revoke President's rule in #Uttarakhand.— ANI (@ANI_news) May 11, 2016
FLASH: Supreme Court says Harish Rawat can take charge as the Chief Minister of Uttarakhand.— ANI (@ANI_news) May 11, 2016
Uttarakhand floor test: Harish Rawat got 33 votes out of 61 qualified members.— ANI (@ANI_news) May 11, 2016
They did their worst. We did our best. Democracy won in Uttarakhand: Rahul Gandhi on Uttarakhand floor test.— ANI (@ANI_news) May 11, 2016