काँग्रेसमध्ये मध्यंतरी वादळ निर्माण झाले. ते शांत झाले आणि पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी शुक्रवारी संघटनेत अनेक बदल केले. त्यात काही ज्येष्ठांची जागा नव्या नेत्यांनी घेतली. या बदलांच्या आधी ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची ‘लोकमत’चे नॅशनल एडिटर हरीश गुप्ता यांनी घेतलेली मुलाखत...महाराष्ट्रातील परिस्थितीकडे तुम्ही कसे बघता?तीन पक्षांच्या युतीचे सरकार चालवणे खूपच कठीण असते. किमान समान कार्यक्रमात म्हटले की, पक्षांची समन्वय समिती असली पाहिजे; परंतु जे सरकारमध्ये बसले आहेत त्यांना ती नको आहे.
आघाडी सरकारने सुशांतसिंहराजपूत, कंगनाच्या विषयाचा विचका केला?यात एकट्या महाराष्ट्राचा हात नाही. दिल्लीचे कारस्थान नाही; पण त्यांचा हात आहे. केंद्राला कोविड, भारत-चीन, बेराजेगारी यावर लक्ष केंद्रित करायचे नाही.
तुमचा पक्ष मूक प्रेक्षक दिसतोय, तर शरद पवार बॅक सीट ड्रायव्हिंग करताहेत?हा प्रश्न त्यांना विचारणे चांगले.
महाराष्ट्रातील निष्क्रियता हीपक्षश्रेष्ठींच्या मौनाशी संबंधित आहे?निष्क्रियता नाही. आम्ही मार्गदर्शनाच्या अपेक्षेत आहोत. ते नेहमी दिल्लीहून मिळते.परंतु पक्षश्रेष्ठी गप्प बसून आहेत?तसे नाही. आमचे सरचिटणीस व राज्याचे प्रभारी दर आठवड्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतात. चर्चा झाल्या.
तुमचे गृहमंत्री म्हणाले, तीआत्महत्या आहे. तसे वक्तव्य व्हायला नको होते. तुम्हाला पक्षश्रेष्ठींकडूनमार्गदर्शन हवे?चुकीविरुद्ध आम्हाला काही करायचे असेल, तर पक्षश्रेष्ठींची परवानगी हवी असते.
तुम्ही सोनिया गांधींना पत्र लिहिले, पण कार्यवाही झाली नाही?कार्यवाही झाली. सहा महिन्यांत विषय मार्गी लागेल.
पत्र लिहिणारे चार जण पक्षाच्या कार्यकारी समितीत असून, काय घडले ते त्यांनी सांगितले पाहिजे.कारवाईचे आश्वासन दिले गेले. पत्रावर सह्या करणारे सगळे २३ जण पक्षाचे ४०-५० वर्षांपासून निष्ठावंत आहेत. आम्ही काही पक्ष सोडून गेलो व परत आलो नाहीत, असे घडलेले नाही.
तुम्ही सोनिया गांधींना नेतृत्व करण्यास भाग पाडले?सोनिया गांधींनी विनंती हंगामी काळासाठी मान्य केली. याच काळात आम्हाला निवडणुका हव्या होत्या. पण तसे झाले नाही.
राहुल गांधींनी पुन्हा अध्यक्ष व्हावे, असे तुम्हाला वाटते?हो. आम्ही एवढेच म्हणालो की, निवडून आलेली कार्यकारिणी समिती असावी. सध्या पक्षाला चेहरा नाही. काँग्रेसला पूर्णवेळ निवडलेला अध्यक्ष असावा, जो लोकांना भेटू शकेल व त्याने आघाडीवर येऊन नेतृत्व करावे.
राहुल गांधी रोज ट्विट करतात. कामकाज ट्विटरवर किती चालणार?मोदी सरकारचा निषेध करण्याचा तो मार्ग आहे; पण तेवढ्याने मदत होणार नाही. रस्त्यावर येऊन कृती हवी.
तुमचे पुढचे पाऊल कोणते?आम्ही सगळे (जी-२३) एकत्र बसून परिस्थितीचा आढावा घेऊ.
तुम्हाला अजूनही आशा आहे?उम्मीदपर दुनिया कायम है.