शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

संविधान-संविधान म्हणत होती काँग्रेस, पंतप्रधान मोदींनी मुळावरच घाव घातला! बोचऱ्या शब्दात चढवला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 3:57 PM

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून संपूर्ण देशभरात जबरदस्त प्रचार सुरू आहे. पक्षांच्या अथवा पक्षातील नेत्यांच्या एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपांमुळे ...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून संपूर्ण देशभरात जबरदस्त प्रचार सुरू आहे. पक्षांच्या अथवा पक्षातील नेत्यांच्या एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपांमुळे देशातील राजकीय वातावरणही चांगलेच ढवळून निघत आहे. यावेळी काँग्रेसह अनेक विरोधी पक्ष संविधान बदलण्याचा आरोप करत भाजपला निशाणा करत होते. भाजपच्या काही नेत्यांच्या विधानांवरून शंका उपस्थित करत तर्क लावत होते. मात्र आज बिहारमध्ये निवडणूक सभांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर बोचऱ्या शब्दांत हल्ला चढवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पूर्णिया आणि गया येथील सभेत संविधानाच्या मुद्द्यावर विरोधकांना पूर्णपणे घेरले. मोदी म्हणाले, संविधानाच्या नावाखाली जे लोक आम्हाला रात्रंदिवस शिव्या देत आहेत, त्यांच्या हातात स्वातंत्र्यानंतरही आतापर्यंत सत्ता होती. मात्र, बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्याची त्यांची हिंमत नव्हती.

तेथे बाबा साहेबांचे संविधान लागू होत नव्हते. हा मोदी आहे, जो संविधानाला समर्पित आहे. आज जम्मू-काश्मीरमध्येही आपले संविधान मोठ्या थाटात लागू झाले. पुढे सीएएला विरोध करणाऱ्यांना इशारा देत मोदी म्हणाले, हा मोदी आहे, ना घाबरतो, ना झुकतो.

आणीबाणीवरही केलं भाष्य - पूर्णियातील सभेला संबोधित करताना मोदींनी आणीबाणीवरही भाष्य केले. ते म्हणाले, संविधान रद्द करण्याचे आणि संविधान ओलीस ठेवण्याचे काम या लोकांनी केले होते. सत्ता आणि सरकार एकाच कुटुंबाच्या हाती असावे, असे ज्यांना वाटते, त्यांच्या डोळात संविधान खुपते. एवढेच नाही तर, या लोकांनी आता घटनात्मक व्यवस्थेनुसार घेतल्या जात असलेल्या निवडणुकांचे निकाल नाकारण्याची धमकी द्यायलाही सुरुवात केली आहे. मात्र त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत. संविधान हे दलित, मागास आणि आदिवासींची शक्ती बनून कायम राहावे, यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने उभे रहायचे आहे, असेही मोदी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Biharबिहारcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी