काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईलच - सोनिया गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 04:22 AM2018-03-10T04:22:00+5:302018-03-10T04:22:00+5:30
भाजपच्या ‘अच्छे दिन'ची अवस्था ‘इंडिया शायनिंग'सारखीच होईल आणि पुढील वर्षी काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल असे प्रतिपादन सोनिया गांधी यांनी शुक्रवारी येथे केले. नरेंद्र मोदी सरकारकडून प्रक्षोभक विधाने केली जात असून, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
मुंबई - भाजपच्या ‘अच्छे दिन'ची अवस्था ‘इंडिया शायनिंग'सारखीच होईल आणि पुढील वर्षी काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल असे प्रतिपादन सोनिया गांधी यांनी शुक्रवारी येथे केले. नरेंद्र मोदी सरकारकडून प्रक्षोभक विधाने केली जात असून, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
देशात २0१४ सालापर्यंत काही विकास झाला नाही, सारी प्रगती गेल्या चार वर्षांतच झाली, असा प्रचार सुरू असून, असे करणे हा नेते, बुद्धिवंत अशा सा-यांचा अपमानच आहे, अशी टीका त्यांनी केली. एका कार्यक्रमात त्या म्हणाल्या की, राज्यघटना बदलण्याबाबत विधाने केली जात असून, यामागे देशाचे विविधतेतून एकता हे रूप बदलण्याचा कुटील डाव आहे. आधार हे सबलीकरणाचे महत्त्वाचे साधन आहे. मात्र मोदी सरकार आधारद्वारे जनतेवर नियंत्रणे आणू पाहत आहे. भ्रष्टाचारविरोध व पारदर्शक कारभारासाठी माहिती अधिकार कायदा आणला.
मात्र मोदी सरकारने तो शीतपेटीत टाकून दिला आहे. समविचारी पक्षांनी एकत्र यावे भाजपच्या पराभवासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यावे. त्यासाठी स्थानिक मतभेद विसरणे आवश्यक आहे असे सांगून त्या म्हणाल्या की, स्वार्थी राजकीय हेतूंसाठी केंद्र सरकारच हिंसाचारास प्रोत्साहन देत आहे.