ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - उत्तराखंडमध्ये निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेसाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपला जबाबदार धरलं आहे. उत्तराखंडमध्ये जनतेने निवडून दिलेल सरकार पाडण्यासाठी भाजपने घोडेबाजार चालवला असून, पैसा आणि मसल पॉवरचा गैरवापर सुरु आहे असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी केला.
उत्तराखंडमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे नरेंद्र मोदींच्या भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. काँग्रेस याविरोधात लोकशाही मार्गाने लढेल असे त्यांनी सांगितले.
उत्तराखंडमधल्या काँग्रेसच्या नऊ आमदारांनी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या विरोधात बंड पुकारलं आहे. राज्यपालांनी हरीश रावत यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी २८ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. टि्वटरवरुन हल्ला चढवताना राहुल यांनी यासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे.
Toppling elected Govts is BJP's new model of Governance. Congress party will fight their demagoguery with Democracy. pic.twitter.com/AFLr1x9vw4— INC India (@INCIndia) March 20, 2016