काँग्रेसच्या स्टार प्रचारक नगमा यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते भिडले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 11:37 AM2018-11-26T11:37:37+5:302018-11-26T11:40:49+5:30

नगमा यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे दिसून आले. तसेच, स्टेजवर दोन नेत्यांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकारही पाहायला मिळाला.

congress workers fight in front of nagma in madhya pradesh | काँग्रेसच्या स्टार प्रचारक नगमा यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते भिडले

काँग्रेसच्या स्टार प्रचारक नगमा यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते भिडले

Next
ठळक मुद्देनगमा यांना भेटण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते भिडलेउशीर झाल्यामुळे जनतेची माफीशिवराज सिंह चौहान यांच्यावर टीका

शिवपुरी : मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. काँग्रेस नेत्या नगमा सुद्धा येथील पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी शिवपुरी येथे दाखल झाल्या होत्या. यावेळी नगमा यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे दिसून आले. तसेच, स्टेजवर दोन नेत्यांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकारही पाहायला मिळाला. दरम्यान, याधीही लोकसभा निवडणुकीदरम्यान उत्तरप्रदेशमध्ये एका प्रचारसभेत नगमा यांच्यासमोर कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. 

नगमा यांनी ज्यावेळी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी कार्यकर्ते आणि त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर नगमा यांनी स्वत: माइक हातात घेऊन सभेला संबोधित केले. नगमा यांनी आयोजित कार्यक्रमात येण्यास उशीर झाल्यामुळे जनतेची माफी मागितली. यावेळी त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या, शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारने बनविलेले रस्तेच असे आहेत की, मी कार्यक्रमाला वेळेवर येऊ शकले नाही. 

दरम्यान, नगमा या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारक आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये ग्वालियर, शिवपुरी, करेरा, डबरा याठिकाणी प्रचार केला आहे. याशिवाय, ज्योतिरादित्य सिंदिया यांच्यासोबत नगमा यांनी ग्लालियरमध्ये रोड शो केला होता. 

 

Web Title: congress workers fight in front of nagma in madhya pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.