शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

Congress Meeting: काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपली, राहुल गांधी यांना पक्षाचा अध्यक्ष करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 7:57 PM

Congress Meeting:बैठकीत पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्याबरोबरच भविष्यातील रणनीतीवर चर्चा करण्यात आली.

नवी दिल्ली: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) रविवारी बैठक झाली. बैठकीत पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्याबरोबरच भविष्यातील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी स्वतः या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. या बैठकीत राहुल गांधी, प्रियांका वड्रा, हरीश रावत, मल्लिकार्जुन खर्गे आणि अंबिका सोनी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

राहुल यांना अध्यक्ष करण्याची मागणीकाँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्याची मागणी करण्यात आली. काँग्रेसचे काही नेते आणि कार्यकर्ते पक्ष मुख्यालयाजवळ जमले आणि त्यांनी राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदी नियुक्तीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यामध्ये दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा अलका लांबा, अनिल भारद्वाज यांच्यासह अनेक नेत्यांचा सहभाग होता. या नेत्यांनीही राहुल गांधींच्या समर्थनार्थ धरणे आंदोलन केले. अलका लांबा म्हणाल्या की, काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला राहुल यांना अध्यक्षपदी पाहायचे आहे.

गेहलोत यांनीही राहुल यांच्या बाजूने आवाज उठवलासभेपूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, निवडणुकीत पराभव आणि विजय होतच असतो. एक काळ असा होता की भाजपला 542 पैकी फक्त दोनच जागा मिळाल्या होत्या. भाजप धर्माचे राजकारण करुन इथपर्यंत आले आहे. आज ना उद्या देशवासीयांना समजेलच. आमचा मार्ग एकता आणि अखंडतेचा आहे. पीएम मोदी आणि केजरीवाल सारखेच बोलतात. आग लावणे खूप सोपे आहे पण ती विझवणे खूप कठीण आहे. राहुल गांधींनी अध्यक्ष व्हावे, यानेच पक्ष एकसंध राहील.

असंतुष्ट गटही सक्रिय आहेतशुक्रवारी काँग्रेसमधील असंतुष्ट गटाच्या म्हणजेच जी-23 गटातील वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली, ज्यामध्ये भविष्यातील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला आनंद शर्मा, कपिल सिब्बल आणि मनीष तिवारी यांसारखे दिग्गज उपस्थित होते. दरम्यान, गांधी कुटुंबातील सदस्यांनी सर्व संघटनात्मक पदांचा राजीनामा दिल्याचे वृत्त काँग्रेस पक्षाने फेटाळून लावले.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी