शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

कपिल सिब्बल, आझाद भडकताच 'हे' दिग्गज नेते राहुल गांधींच्या मदतीला; असे केले ट्विट...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 2:47 PM

राहुल गांधी यांनी, या बैठकीत, ज्या काँग्रेस नेत्यांनी पक्षातील सुधारणेसाठी सोनिया गांधींना पत्र लिहिले आहे, त्यांनी भाजपाशी हातमिळवणी केली असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

नवी दिल्ली -काँग्रेस कार्यकारणी समितीच्या बैठकीला सुरुवात होताच, काँग्रेसमधील आपसातला वाद चव्हाट्यावर आला आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधी यांनी, या बैठकीत, ज्या काँग्रेस नेत्यांनी पक्षातील सुधारणेसाठी सोनिया गांधींना पत्र लिहिले आहे, त्यांनी भाजपाशी हातमिळवणी केली असल्याचा गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधींच्या या आरोपावर काँग्रेसचे  वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी ट्विट करत आक्षेप घेतला होता.

कपील सिब्बल यांनी ट्विट केले आहे, की "आम्ही भाजपाशी हातमिळवणी केली, असे राहुल गांधी म्हणतात. राजस्थान उच्च न्यायालयात पक्षाची बाजू यशस्वीपणे मांडली. मणीपूरमध्ये भाजपा सरकारविरोधात पक्षाची बाजू मांडली. गेल्या 30 वर्षांत भाजपाच्या पथ्यावर पडेल, असे एकही विधाम केले नाही. तरी आम्ही भाजपाशी हातमिळवणी केल्याचे म्हटले जाते,' अशा शब्दांत सिब्बल यांनी आपली नाराजी व्यक्त करत राहुल गांधी यांना सुनावले आहे.

कपिल सिब्बल यांचे हेच ट्विट रिट्विट करत काँग्रेस प्रवक्ता रणदीप सिंह सुरजेवाला यांनी म्हटले आहे, की माध्यमांत राहुल गांधींसंदर्भात जे बोलले जात आहे, ते राहुल गांधी यांनी म्हटलेले नाही. सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की ''राहुल गांधी यांनी, असे काहीही म्हटलेले नाही. यासंदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही. कृपया माध्यमांवरील खोट्या बातम्यांमुळे गैरसमज निर्माण होऊ देऊ नका अथवा चुकीची माहितीही पसरवू नका. मात्र हो, आपसात लढत बसण्याऐवजी क्रूर मोदी सरकारविरुद्ध एकजुटीने लढणे अधिक आवश्यक आहे.

तत्पूर्वी, गुलाम नबी आझाद यांनी आक्रमक पवित्रा घेत, भाजपासोबत हातमिळवणी केल्याचा आरोप सिद्ध झाल्यास राजीनामा देईन, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी याच बैठकीत राजिनामा देण्याची शक्यता आहे.

सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात नेमके काय?देशभरातील काँग्रेसच्या 23 वरिष्ठ नेत्यांनी पक्षात मोठ्या बदलांची गरज असल्याचं मत त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष गरजेचा असल्याची महत्त्वाची मागणी 23 नेत्यांनी पत्रातून केली. यामध्ये काँग्रेस कार्यसमितीच्या अनेक सदस्यांसह, पाच माजी मुख्यमंत्री, खासदार आणि माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. पक्ष जनाधार आणि तरुणांचा विश्वास गमावत आहे. पक्षाला प्रभावी नेतृत्त्वाची गरज आहे. तो केवळ काम करताना दिसू नये, तर त्याचं काम प्रत्यक्ष जमिनीवर दिसायला हवं. सीडब्ल्यूसीची निवडणूक व्हायला हवी आणि पक्षाला पुन्हा उभारी घ्यावी यासाठी ठोस योजना तयार करायला हवी, असं 23 नेत्यांनी पत्रात म्हटले आहे.

काँग्रेस नेत्यांनी मांडल्या अडचणी-१. राज्य काँग्रेसचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तांमध्ये नाहक विलंब.२. सन्मान आणि स्वीकारार्ह असलेल्या नेत्यांच्या प्रदेश काँग्रेसवर नियुक्त्या होत नाहीत.३. राज्य प्रमुखांना संघटनेशी संबंधित निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही.४. युथ काँग्रेस आणि एनएसयूआयमधील निवडणुकांमुळे संतुलन बिघडलं.

काँग्रेस नेत्यांच्या मागण्या काय?१. नेतृत्वात स्थायी आणि प्रभावी बदल व्हावेत.२. काँग्रेस कार्यकारी समितीच्या निवडणूक व्हाव्यात३. पक्षानं गमावलेली ताकद परत मिळवण्यासाठी योजना गरजेची४. संघटनेतील प्रत्येक स्तरावर निवडणूक व्हावी५. संसदीय पार्टी बोर्डाची स्थापना व्हावी.६. प्रदेश काँग्रेसला ताकद दिली जावी.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्‍ट नसल्याचा दावा

CoronaVaccine : 73 दिवसांत नाही! सीरमनं स्वतःच सांगितलं COVISHIELD लस केव्हा येणार बाजारात

ट्रम्प यांना पॉर्नस्टारला 33 लाख रुपये द्यावे लागणार; 'तो' सनसनाटी आरोप पडला महागात

CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीkapil sibalकपिल सिब्बल